Salman Khan's Sister has Moving Wall at Her Place : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि तिचा नवरा आयुष शर्मा हे वांद्रे येथे का मोठ्या आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतात. त्याची एक झलक आता फराह खानच्या युट्यूब चॅनलमुळे सगळ्यांना पाहायला मिळत आहे. या आलिशान अपार्टमेंटमध्ये एक मोठी अशी बालकनी आहे आणि मुंबईचं आकाश असं जणू स्पष्ट दिसतं. ज्यामुळे आयुषनं त्याला मुंबईचं दुबई म्हटलं आहे. आयुष आणि अर्पिता त्यांच्या दोन्ही मुलांसोबत या घरात राहतात. त्यात त्यांनी एक हलणारी भिंत बनवली आहे.
फराह जेव्हा त्यांच्या घरात येते तेव्हा आयुषनं तिला सगळं घर दाखवलं. सुंदर बाल्कनी आणि व्ह्यू दाखवत तो म्हणाला, 'वेलकम आपल्या मुंबईच्या दुबईमध्ये.' त्यावर फराह हसून म्हणाली, 'हे तर दुबईपेक्षा पण चांगलं आहे!'
आयुष आणि अर्पिताचा लिव्हिंग रूम खूपच मोठा आहे. ते पाहून फराहनं हसत विचारलं, 'इथे तुम्ही क्रिकेट खेळता का काय?' त्यावर आयुष म्हणाला, 'अर्पिताला मोठं घर हवं असतं, पण मग ती फक्त तीन कोपरेच वापरते. माझ्यासाठी एक वेगळा रूम आहे आणि अर्पिता व आहिल एकत्र राहतात.' रूम दाखवताना आयुष म्हणाला, 'हा अर्पिता आणि आहिलचा रूम आहे, पण आता ती माझा प्रायव्हेट एरिया देखील तिच्या ताब्यात घेतला आहे. ही माझी प्रायव्हेट जागा आहे, जिथे मी आराम करतो. पण आता अर्पितानं तिथला सोफा पण वापरायला सुरुवात केलीय.'
त्यांच्या कॉमन एरियामध्ये एक हलणारी भिंत आहे. याविषयी सांगत आयुष म्हणाला, जेव्हा घरी पार्टी सुरु असते ती हलवण्यात येते. गरज पडल्यास बंद करून वेगवेगळे रूम्स बनवता येतात. अर्पिता म्हणाली, 'हे मुलांना पार्टीपासून दूर ठेवण्यासाठी आहे.' भिंत बंद करत आयुष म्हणाला, 'आता तुम्ही अशा जागेत आलात जिथे माझीच एंट्री बंद आहे.' त्यावर मग तो हसून म्हणाला, 'अर्पिता जेव्हा माझ्यावर रागावते, तेव्हा ती दारं लावून घेत नाही तर ही भिंत लावते.' फराहने लगेच विचारलं, 'म्हणजे ती पार्टिशन करते?' आयुषने हो म्हणत उत्तर दिलं. त्यावर फराह पुन्हा हसत म्हणाली, 'आणि ती तुझ्यावर रागावलेली राहावी यासाठी तू किती वेळा प्रयत्न करतो?'
हेही वाचा : 70 वर्षांच्या रेखा यांनी 19 वर्षांनी लहान अभिनेत्याला केलं ओठांवर KISS! अन् साकारली आईची भूमिका
अर्पिता आणि आयुषच्या घरात पांढरा आणि निळा रंग सगळ्यात जास्त वापरण्यात आला आहे. त्याशिवाय सलमान खाननं पेन्ट केलेली एक पेन्टिंग देखील त्यांच्या घरी आहे. त्याविषयी सांगत अर्पिता ही ‘आयतुल कुर्सी’ आहे असं म्हणाली. फराह म्हणाली, 'हे त्याचं सगळ्यात सुंदर चित्र आहे.' तर आयुष म्हणाला, 'हे चित्र माझ्यासाठी खूप लकी आहे. हे घरात आलं आणि त्याच्या काही मिनिटांनी ‘अंतिम’चा पोस्टर रिलीज झाला.' त्याच व्ह्लॉगमध्ये त्यांनी आपलं मॉड्युलर किचनही दाखवलं. त्यांच्या किचनमध्ये सहा एसी आणि चार फ्रिज आहेत. पण मग दोघंही हसत सांगतात, 'आम्ही इथे कधी स्वयंपाक करतच नाही. आमच्या बिल्डिंगमधल्या रेस्टॉरंटमधूनच ऑर्डर करतो.'