Marathi News> मनोरंजन
Advertisement

'पहला नशा'मधील 'ही' अभिनेत्री आता कुठे आहे? 90 च्या दशकात गाजवले होते बॉक्स ऑफिस

90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडवर वर्चस्व गाजवलं, पण काळानुसार त्यांचे नाव गायब झाले. मात्र, एक अभिनेत्री मात्र अशी आहे, जिने अनेक उत्कृष्ट चित्रपटांत भूमिका साकारल्या असून आजही बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पाहूया कोण आहे ही अभिनेत्री?  

'पहला नशा'मधील 'ही' अभिनेत्री आता कुठे आहे? 90 च्या दशकात गाजवले होते बॉक्स ऑफिस

Ayesha Jhulka Birthday Special: 90 च्या दशकात अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली. त्या काळातील एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव आहे आयेशा झुल्का. 'पहला नशा पहला खुमार' या गाण्यातून तिच्या अभिनयाला आजही प्रेक्षक आठवतात. अनेक हिट चित्रपट करूनही काही वर्षांनी आयेशा चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. पण आता ती पुन्हा अभिनयात सक्रिय होत आहे. आयेशा झुल्का आज तिचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिला अनेक कलाकारांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत. 

बालपण आणि सुरुवातीचं करिअर

28 जुलै 1972 रोजी श्रीनगर येथे जन्मलेल्या आयेशाचे वडील भारतीय हवाई दलात विंग कमांडर तर आई कॉस्च्युम डिझायनर होत्या. लहानपणीच ती चित्रपटसृष्टीकडे वळाली आणि 1983 मध्ये तिने बालकलाकार म्हणून 'कैसे कैसे लोग' या चित्रपटात काम केलं. पुढे मोठी झाल्यावर 1990 मध्ये तेलुगू चित्रपट 'नेती सिद्धार्थ' मधून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

बॉलिवूडमधील यश

1991 मध्ये सलमान खानसोबतच्या 'कुर्बान' या चित्रपटातून आयेशाने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि तिचं नाव चर्चेत आलं. त्यानंतर 1992 हे वर्ष तिच्या करिअरसाठी खास ठरलं, कारण या वर्षी तिचे चार चित्रपट प्रदर्शित झाले- 'माशूक', 'खिलाडी', 'जो जीता वही सिकंदर' आणि 'अनाम'. यापैकी 'खिलाडी' आणि 'जो जीता वही सिकंदर'ने तिला घराघरात लोकप्रिय केलं. त्या काळात तिने 'दलाल', 'संग्राम', 'बलमा', 'मासूम', 'मेहेरबान', 'मुकद्दर', 'चाची 420' यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले. तिची आणि अक्षय कुमारची जोडी प्रेक्षकांना खूप आवडायची.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूडपासून अंतर आणि पुनरागमन

2000 नंतर आयेशाने चित्रपटांपासून थोडा ब्रेक घेतला. 2003 मध्ये तिने कंस्ट्रक्शन व्यवसायात कार्यरत असलेल्या समीर वाशी यांच्याशी लग्न केलं. एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की तिने आणि तिच्या पतीने मुलं न होण्याचा निर्णय घेतला होता. काही वर्षांनंतर आयेशा पुन्हा अभिनयात दिसू लागली. 2018 मध्ये ती 'जिनियस' या चित्रपटात झळकली. यानंतर तिने वेब सिरीजच्या माध्यमातूनही आपली ओळख निर्माण केली - 'हुश हुश' (2022) आणि 'हॅपी फॅमिली' (2023) या मालिकांमध्ये तिच्या अभिनयाचं कौतुक झालं.

हे ही वाचा: सुनील शेट्टी पुन्हा चर्चेत; वैवाहिक जीवनाबाबत असं काय बोलला की, नेटकऱ्यांनी सुनावलं?

आजचं आयुष्य

सध्या आयेशा चित्रपटसृष्टीत मर्यादित प्रमाणात काम करते, पण सोशल मीडियावर ती सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवरून ती चाहत्यांशी संवाद साधते, शूटिंगमधील फोटो, ट्रॅव्हल पोस्ट्स आणि खासगी जीवनातील झलक शेअर करते. तिच्या साध्या आणि मोहक व्यक्तिमत्त्वामुळे आजही तिचे चाहते तिला प्रचंड प्रेम देतात.

 

Read More