Shivaji Maharaj Voice In Chhaava: छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा छावा हा सिनेमा चांगलाच गाजतो आहे. अभिनेता विकी कौशल यांने शंभूराजेंची आणि रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. छावा सिनेमा हा 2025 या वर्षातील पहिला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. संभाजी महाराज यांची स्वराज्यनिष्ठा आणि धर्माबद्दल असलेली आस्था आणि त्यांनी दिलेले बलिदान हे पाहताना सर्वांच्याच डोळ्यात अश्रू येत आहेत. चित्रपटाचा शेवट पाहताना मन सून्न होतो. मात्र या सिनेमात आणखी एक प्रसंग आहे तो म्हणजे शंभूराजे आणि शिवाजी महाराजांमधील संवाद. तुम्हाला माहितीये का चित्रपटातील शिवाजी महाराजांचा आवाज कोणाचा आहे?
छावा सिनेमाने संपूर्ण देशभरात चांगली कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण बजेच 165 कोटी असताना सिनेमाने 300 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. दोन आठवड्यांनंतरही सिनेमाची घोडदौड सुरूच आहे. संपूर्ण जगात सिनेमाने 400 कोटींची कमाई केली आहे. सिनेमातील शेवटचा प्रसंग काळीज चिरुन टाकणारा आहे. मात्र त्यातील आणखी एक प्रसंग म्हणजे आईच्या शोधात निघालेले बाल शंभूराजे आणि त्यांच्या हाकेला ओ देणारे आबासाहेब म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज.
छावा सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा कोणीही साकारली नसली तरी त्यांचे अस्तित्व मात्र संपूर्ण सिनेमात दाखवले आहे. बाल शंभूराजे आईला आवाज देतात आणि त्यांना छत्रपती शिवाजी महाराज उत्तर देतात. त्यांना मार्गदर्शन करतात, सांत्वन करतात, मार्ग दाखवतात, असे प्रसंग सिनेमात दाखवले आहेत. पण तुम्हाला माहितीये का सिनेमात शिवाजी महाराजांचा आवाज कोणाचा आहे?
सिनेमातील शिवाजी महाराजांचा आवाज हा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी दिला आहे. विजय विक्रम हे डबिंग आर्टिस्ट आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे.