Apoorva Mukhija Networth : सोशल मीडियावर मजेदार आणि विचार करायला लावणाऱ्या व्हिडिओसाठी ओळखली जाणारी अपूर्वा मुखीजा सगळ्यांना माहित आहे. अपूर्वा ही 'द रिबेल किड' म्हणूनही ओळखली जाते. अपूर्वा सध्या एका वादामुळे चर्चेत आहे. नुकत्याच एका फ्लाइटमध्ये तिला इमर्जन्सी सीट नाकारण्यात आली. अपूर्वानं सोशल मीडियावर या विषयी माहिती दिली आहे.
अपूर्वानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. विमान कंपनींच्या कर्मचाऱ्यांनी तिला ती सीट मिळवण्यासाठी 'पात्र' नसल्याचं म्हटलं आहे. हे सगळं अपूर्वानं शेअर केलं असून ती यावेळी म्हणाली, 'मी झोप न घेता फ्लाइट पकडायला आले होते. मी स्टाफला इमर्जन्सी सीट विचारली, तर काउंटरवर असलेल्या महिलेनं सांगितलं की, ‘ही दिव्यांग लोकांना देता येत नाही.’ "
या सगळ्यावर आश्चर्य व्यक्त करत अपूर्वानं म्हटलं की ती पूर्णपणे सक्षम आहे. पण त्यावर ती महिला स्टाफ म्हणाली, 'तुम्ही आजारी दिसता.' अपूर्वाने विचारलं, 'तुम्हाला कोणी सांगितलं?' त्यावर ती महिला उत्तर देत म्हणाली, 'तुमचा चेहरा बघून वाटतंय.' जेव्हा अपूर्वा रागावली, 'तेव्हा ती कर्मचारीही चिडली.'
COVID काळात सोशल मीडियावर व्हिडीओ बनवून अपूर्वा ही यशस्वी झाली आहे. या काळात तिनं जे केलं त्यानं सगळ्यांना यश मिळालं. तिच्या कमाई विषयी सांगायचं झालं तर ब्रँड कोलॅबोरेशन आणि सोशल मीडियावरील जाहिरातींमधून होते.
जून 2025 च्या एका रिपोर्टनुसार, तिची नेटवर्थ सुमारे 41 कोटी रुपये आहे. ती दररोज 2.5 लाख रुपये कमावते. एका 30 सेकंदांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून तिला 2 लाख रुपये मिळतात, तर एका रीलमधून 6 लाख रुपये मिळतात. इन्स्टाग्राम पोस्टसाठी ती 2 ते 5 लाख रुपये घेते. यूट्यूबवरून महिन्याला ती 5 लाख रुपये कमावते. एका ब्रँड डीलसाठी ती 10 लाख रुपये घेते.
रिपोर्ट्सनुसार, अपूर्वाचा जन्म 1998 मध्ये दिल्लीमध्ये झाला. तिनं मणिपाल युनिव्हर्सिटी, जयपूर इथून कॉम्प्युटर इंजिनियरिंग केलं. 2020 च्या लॉकडाउनमध्ये तिने घरूनच छोटं स्किट्स, मजेशीर आणि बोल्ड व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. हळूहळू लोकांनी तिला पसंत करू लागलं आणि तिचे इंस्टाग्राम व यूट्यूबवर फॉलोअर्स वाढले. आज ती Nike, OnePlus, Netflix, Amazon, Google, Meta, Maybelline, Swiggy यांसारख्या 150 पेक्षा जास्त मोठ्या ब्रँड्ससोबत काम करते. ती वेबसीरिजमधूनही झळकली आहे. Forbes ने तिला 2023 आणि 2024 मध्ये ‘टॉप 100 डिजिटल स्टार्स’ यादीत स्थान दिलं आहे.