Marathi News> मनोरंजन
Advertisement

कोण आहे Khrisha Shah, जी लवकरच होणार अंबानी कुटुंबाची सून? फोटो व्हायरल

क्रिशा शाह (Khrisha) डिसेंबर 2021 पासून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

कोण आहे Khrisha Shah, जी लवकरच होणार अंबानी कुटुंबाची सून? फोटो व्हायरल

मुंबई : व्यवसायाच्या क्षेत्रात सर्वात जास्त चर्चेत असणारे कुटुंब म्हणजे अंबानी कुटुंब. अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्य कोणत्या ना कोणत्या कारणानी नेहमीच चर्चेत असतो. आता या कुटुंबात आणखी एका सदस्य जोडला जाणार आहे. जी लवकरच अंबानी कुटूंबाची सुन होणार आहे. उद्योगपती अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मोठा मुलगा  जय अनमोल अंबानी लवकरच लग्न करणार आहे. त्याचा क्रिशा शाहसोबत नुकताच साखरपू़डा देखील पार पडला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

क्रिशा शाह लवकरच आता अंबानी कुटुंबाची सुन होणार आहे. क्रिशा शाह (Khrisha) डिसेंबर 2021 पासून प्रसिद्धीच्या झोतात आली आहे, कारण त्याच महिन्यात अनिल आणि टीनाचा मोठा मुलगा जय अनमोलने क्रिशासोबत त्याच्या 30व्या वाढदिवसाला एंगेजमेंट केली होती. ज्यामुळे सर्वच लोकं आता तिच्याबद्दल जाणून घेण्यात उत्सुक आहेत.

मुंबईत जन्मलेली क्रिशा शाहचे सुरूवातीचे शिक्षण मुंबईतुन पूर्ण झाले, त्यानंतर ती उच्च शिक्षणासाठी अमेरिका आणि युकेमध्ये गेली. क्रिशा एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. याशिवाय ती 'लव्ह नॉट फियर' मोहिमेची अधिवक्ता आहे. रिपोर्टनुसार, क्रिशा आणि तिचा भाऊ मिशाल शाह हे दोघे मिळून 'डिस्को' नावाची कंपनी चालवतात. कृशा ही त्याची सह-संस्थापक तसेच सीईओ आहे.

क्रिशाचे वडिल काय करतात याबद्दलची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु एका रिपोर्टनुसार तिचे वडिल बिझनेसमॅन आहेत आणि आई फॅशन डिझायनर आहे.

एका मुलाखतीत क्रिशाने सांगितले होते की, तिने अनेक कंपन्यांमध्ये काम केले, पण तिला तिच्या वडिलांसारखे व्हायचे होते. ज्यामुळे तिने तिच्या स्वत:ची कंपनी सुरू केली.

fallbacks

जय अनमोलबद्दल बोलायचे झाले तर यूकेमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो त्याचे वडील अनिल अंबानी यांना व्यवसायात मदत करत आहे.

क्रिशा सोशल मीडियावर फारशी सक्रिय नसते, परंतु ती 'डिस्को'च्या इन्स्टा फीडवर प्रेरणादायी संदेश नेहमी लोकांना देत असते.

क्रिशा शाह लवकरच अनमोलसोबत लग्नबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाच्या विधींनाही सुरुवात झाली आहे. अनमोलची चुलत बहीण अंतरा मारवाह हिने या जोडप्याच्या प्री-वेडिंग सोहळ्याची झलक देखील सोशल मीडियावर शेअर केली, ज्यामध्ये अनमोल आपल्या लेडीलव्हला घेऊन तिच्यासोबत नाचताना दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

Read More