Marathi News> मनोरंजन
Advertisement

Who is Isha Rikhi: बादशाहला डेट करणाऱ्या अभिनेत्रीचे हे सुंदर फोटो पाहिले का?

Rapper-singer is dating a Punjabi actress Isha Rikhi : लोकप्रिय रॅपर आणि गायक बादशाहच्या आयुष्यात नव्या महिलेची एन्ट्री झालीये.

Who is Isha Rikhi: बादशाहला डेट करणाऱ्या अभिनेत्रीचे हे सुंदर फोटो पाहिले का?

मुंबई : लोकप्रिय रॅपर आणि गायक बादशाह आता सिंगल नाहीये. कारण त्याच्या आयुष्यात अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. पहिल्या पत्नीपासून वेगळा झाल्यानंतर सध्या तो एका अभिनेत्रीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. बादशाहचे खरे नाव आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया असे आहे. रॅपर बादशाह (Rapper Badshah) त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी बोलतो. 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात तो त्याची पहिली पत्नी जास्मिनपासून वेगळा झाला. दोघांना एक मुलगी देखील आहे. पण बादशाह हा पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीला डेट करत असल्याची चर्चा आहे. (Badshah is not single)

कोण आहे ईशा रिखी? (Who is Isha Rikhi)

मूळची चंदीगडची असलेली ईशा रिखी (Actress Isha Rikhi) ही पंजाबी चित्रपटांमध्ये लोकप्रिय नाव आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, बादशाह आणि ईशा एका कॉमन फ्रेंडने दिलेल्या पार्टीत पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर ते गेल्या एक वर्षापासून एकमेकांना डेट करत असल्याचं पुढे आले आहे. बादशाहने याबाबत आपल्या कुटुंबियांना देखील सांगितलं असल्याचं पुढे आले आहे.

fallbacks

बादशाहने मात्र स्वत: या वृत्ताला दुजोरा दिलेला नाहीये. सोशल मीडियावर नेहमीच तो सक्रिय असतो. तर ईशा रिखी देखील तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

fallbacks

बादशाह आणि ईशा रिखी एकमेकांना डेट करत असल्याची ही अफवा आहे की सत्य याबाबत तर हे दोघेच स्पष्ट करु शकतील.

Read More