Marathi News> मनोरंजन
Advertisement

Hrithik Roshan चा हात धरुन रात्री हॉटेल बाहेर पडलेली ती सुंदरी नक्की आहे तरी कोण?

हृतिक रोशनला सबासोबत स्पॉट करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

 Hrithik Roshan चा हात धरुन रात्री हॉटेल बाहेर पडलेली ती सुंदरी नक्की आहे तरी कोण?

मुंबई  : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या त्यांच्या लव्ह लाईफमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. तो अलीकडेच मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाला आणि समोर आलेल्या त्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये एक ग्लॅमरस मुलगी देखील दिसली.

हृतिक या मुलीला डेट करत असल्याचं आता समोर आला आहे. ती दिसायला इतकी सुंदर आहे की हृतिकनंतर आता चाहतेही तिच्या बद्दल जाणून घेण्यात उत्सुक आहेत.

हृतिक रोशनचा हात धरुन बाहेर पडलेल्या या मुलीने चेहऱ्यावर मास्क लावल्याने तरुणीची ओळख पटत नव्हती. हा व्हिडीओ व्हायरल होताच हृतिक त्या मुलीला डेट करत असल्याचा अंदाज चाहत्यांनी बांधल. मात्र आता त्यावेळी मुलीची ओळखही पटली नाही. 

आता हृतिकची ही गर्लफ्रेंड कोण आहे याची माहिती समोर आली आहे. हृतिक रोशन आणि सुझैन खान यांनी 2014 मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला. ते दोन मुलांचे पालक आहेत. 

fallbacks

आतापर्यंत सुझैन आणि हृतिक एकत्र वेळ घालवताना दिसत होते. त्यानंतर सुझैन खानने आपल्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवशी काही फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर एकच चर्चा सुरु झाली. 

त्यानंतर आता हृतिक सोबत स्पॉट झालेल्या या मुलीचं नाव समोर आलं आहे. तिचं नाव सबा आझाद असं आहे. सबा अभिनेत्री आहे. रात्री उशिरा दोघांनी हात धरुन हॉटेल बाहेर येताच डेटिंगच्या अफवा पसरायला सुरुवात झाली

हृतिक रोशनसोबत दिसणारी मिस्ट्री गर्ल अभिनेत्री सबा आझाद आहे. या 32 वर्षीय अभिनेत्रीने 2008 मध्ये 'दिल कबड्डी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.त्यानंतर तिने 2011 मध्ये साकिब सलीम विरुद्ध 'मुझसे दोस्ती करोगे' या चित्रपटात मुख्य भूमिका केली.

पदार्पण केल्यापासून, सबा आतापर्यंत 5 चित्रपटांमध्ये दिसली आहे. फील्स लाइक इश्क हा तिचा शेवटचा चित्रपट होता. सबा एक संगीतकार आणि गीतकार देखील आहे.

fallbacks

अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर सुमारे 81.7 हजार फॉलोअर्स आहेत. ती महान थिएटर सफदर हाश्मी यांची भाची आहे.

न्यूयॉर्क आणि फ्लॉरेन्समधील फेस्टिव्हलला गेलेल्या दिग्दर्शक इशान नायरच्या Guroor या शॉर्ट फिल्ममध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्यानंतर तिचा सिनेमाशी संबंध सुरू झाला.

fallbacks

हृतिक रोशनला सबासोबत स्पॉट करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या फक्त हृतिक आणि सबाचीच सगळीकडे चर्चा आहे.

 

Read More