Who Is Samantha's New Boyfriend : चित्रपटसृष्टी म्हटलं की कलाकार आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा तर नेहमीच रंगतात. अनेक कलाकार हे काहीही न लपवता त्यांच्या रिलेशनशिपविषयी जगजाहिर राहतात. अनेकदा ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरतानाचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. पण अनेकदा ते मित्र असले तरी त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु होतात. त्याच प्रकारे आता दाक्षिणात्य अभिनेत्री समांथाच्या अफेयरची चर्चा सुरु झाली आहे.
समांथा रुथ प्रभूच्या लव्ह लाइफची गेल्या बऱ्याच काळापासून चर्चा सुरु आहे. असं म्हटलं जातं की नागा चैतन्यशी घटस्फोट घेतल्यानंतर आता तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एन्ट्री झाली आहे. गेल्या महिन्यात फेब्रुवारीमध्ये समांथा ही रूमर्ड बॉयफ्रेंडसोबत दिसली होती आणि आता पुन्हा एकदा त्याचे नवीन फोटो हे समोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत.
समांथा रुथ प्रभूचं नाव ज्या व्यक्तीसोबत जोडण्यात आलं आहे तो कोण आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर समांथा आणि राज पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. त्यामुळे त्यांच्या डेटिंगच्या चर्चा आणखी सुरु झाल्या आहेत. हा फोटो त्यांच्या एक मित्राच्या वाढदिवसाच्या निमित्तानं असलेल्या ब्रन्चच्या वेळीचा आहे. यात समांथानं हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. तर राज निदिमोरु कॅज्युअल लूकमध्ये दिसणार आहे. या फोटोमध्ये दोघं एकत्र पोज देताना दिसत आहेत आणि राज हा अगदी बरोबर समांथाच्या मागे उभा आहे. लक्ष देऊन पाहिलं तर समांथाच्या खांद्यावर हात ठेवला आहे.
समांथाचं नाव ज्या व्यक्तीसोबत जोडण्यात आलं आहे तो कोणी दुसरा नाही तर दिग्दर्शक राज निदिमोरू आहे. समांथानं 1 फेब्रुवारी रोजी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वर्ल्ड पिकलबॉल लीगमध्ये राज निदिमोरूसोबतचा फोटो शेअर केला आहे. समांथा ही चेन्नई सुपर चॅम्प्ल पिकलबॉल टीमची मालकिन आहे आणि या फोटोंपैकी एकात तो राज निदिमोरूचा हात पकडत असल्याचे दिसले. या एका फोटोनं त्यांच्या अफेअरच्या चर्चा वाढू लागल्या आहेत.
हेही वाचा : 14 वर्षांनंतर पुन्हा कमबॅक करणार रंभा! निर्मात्याचा खुलासा - 2000 कोटींची संपत्ती असलेल्या पतीनं केली विनंती
राज निदिमोरु विषयी बोलायचं झालं तर तो एक लोकप्रिय दिग्दर्शक आहे. त्यानं राज आणि डीके दिग्दर्शित जोडीचा एक भाग होता. त्यानं 'द फॅमिली मैन’, ‘फर्जी’, ‘सिटाडेल: हनी बनी’ आणि ‘गन्स एंड गुलाब्स’ अशा अनेक सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. आंध्र प्रदेशच्या तिरुपति मंदिरात अनेकदा तो जातो. त्यानं भारतात इंजीनियरींगचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर त्यानंतर तो अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी गेला.