Salman Khan's Grand Mother: सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाविषयी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्याच्या आई-वडिलांपासून ते भाऊ, बहिण आणि सासरच्या मंडळींपर्यंत सगळ्यांचेच चर्चेत असणं हे सामान्य आहे. मात्र, फारच थोड्यांना माहिती आहे की सलमान खानची आजी कोण होती आणि तिचा जीवनप्रवास कसा होता.
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान जितका प्रसिद्ध आहे. तितकंच त्याचं कुटुंबही चर्चेत असतं. त्याचे वडील सलीम खान हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज पटकथालेखक होते. तर सलमान खानची सावत्र आई हेलेन त्या काळातील ग्लॅमरस अभिनेत्री होत्या. हेलन या आजही लाखो चाहत्यांचा मनात घर करुन राहील्या आहेत. सलमान खानचे दोन्ही भाऊ - अरबाज आणि सोहेल- यांनीही फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. अरबाज खानने दुसरे लग्न देखील केले आहे आता तो लवकरचं दुसऱ्यांदा बाप होणार आहे.
सलीम खान यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1935 रोजी मध्य प्रदेशातील बालाघाट येथे झाला. त्यांचे वडील अब्दुल रशीद खान हे डीआयजी पदावर कार्यरत होते, तर त्यांची आई - सिद्दिका बानो खान - म्हणजेच सलमान खानची आजी, क्षयरोगाने (टीबी) पीडित होत्या.
सलीम खान यांनी एका भावनिक मुलाखतीत सांगितले होते की, 'जेव्हा मी फक्त चार वर्षांचा होतो, तेव्हा माझ्या आईला टीबी झाला. त्यामुळे आम्हा मुलांना तिच्याजवळ जाण्याची परवानगी नव्हती. आम्ही केवळ लांबूनच तिला पाहायचो.' या आजारामुळे त्यांना आईचा सहवास फार कमी काळ मिळाला आणि नऊव्या वर्षीच त्यांनी आपली आई गमावली.
आई गेल्यानंतर फार काळ झाला नाही, आणि 1950 मध्ये, केवळ 14 व्या वर्षी, सलीम खान यांनी आपल्या वडिलांनाही गमावले. त्यामुळे बालपणातच त्यांच्यावर दुःखाचे आणि जबाबदाऱ्यांचे ओझे कोसळले.
आई-वडिलांचा आधार लवकरच हरवल्यानंतर सलीम खान यांनी स्वतःचे आयुष्य उभे करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. शिक्षण घेणं आणि त्यानंतर मुंबईत करिअर घडवणं, हे त्यांच्यासाठी सोपे नव्हतं. पण त्यांनी हार न मानता, लेखनकलेतून स्वतःसाठी स्वतंत्र ओळख निर्माण केली. आज सलमान खान ज्या मोठ्या कुटुंबाचा भाग आहे, त्या कुटुंबाचे खंबीर पाया सलीम खान यांनी अशा कठीण परिस्थितीतही उभा केला आहे.