आमिर खान फक्त सिनेमातच नाही तर तो प्रँक करण्यातही परफेक्शनिस्ट आहे. आमिर खान आपल्या सिनेमांच्या सेटवर प्रँक करण्यात अतिशय लोकप्रिय आहे. दिल सिनेमाच्या सेटवर माधुरी दीक्षित आणि इश्क सिनेमाच्या सेटवर जुही चावला या दोन्ही अभिनेत्रींसोबत आमिर खानने केलेली एक गोष्ट चर्चेचा विषय आहे. आमिर खानने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या या अतरंगी प्रँकबद्दल सांगितलं
आमिर खान यावेळी म्हणाला की, "खरं तर, मी ज्या अभिनेत्रींच्या हातावर थुंकलो, ती नंबर वन झाली." आमिर खानला याचे थोडे लॉजिकल उत्तर विचारलं असता तो म्हणाला की, "मला त्या बहाण्याने अभिनेत्रींचा हात हातात धरता येतो. हे सगळं करताना मला फक्त मजा यायची, दुसरे काही नाही."
आमिरने सांगितले की, त्याचे अशा पद्धतीचे प्रँक अगदी 'दंगल' सिनेमापर्यंत चालू राहिले. त्याने पुढे सांगितले की, तो आताही असेच करतो. आमिर खान त्या अभिनेत्रीला सांगायचा की, त्याला हात वाचता येतो. आणि मग अभिनेत्री आपला हात त्याला वाचायला द्यायची आणि मग तो त्यावर थुंकायचा.
'इश्क' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने जुही चावलासोबतही असेच केले. त्याने जुहीला सांगितले की, त्याला ज्योतिषशास्त्र माहित आहे. जुहीने त्याला तिचा हात वाचायला सांगितले. संपूर्ण क्रूसमोर आमिरने जुहीच्या हातावर थुंकले आणि पळून गेला. जुहीला याचा इतका राग आला की, ती दुसऱ्या दिवशी शूटला आली नाही. जुहीच्या रागावर आमिरलाही राग आला. ते दोघेही अनेक वर्षे बोलत नव्हते.
'दिल' चित्रपटातील 'खंबे जैसी खडी है...' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान त्याने माधुरीसोबतही असेच केले. आमिरने माधुरीला सांगितले की, तो हात वाचण्यात खूप तज्ज्ञ आहे. हे ऐकून माधुरीने आमिरकडे हात पुढे केला. आमिरने काही वेळ तिच्या हाताकडे पाहिले आणि तेच केले.
जर आपण आमिरच्या कामाबद्दल बोललो तर, त्याचा 'सितारे जमीन पर' हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये सुरू आहे. त्यानंतर आमिर रजनीकांत यांच्या 'कुली' या चित्रपटात दिसणार आहे. १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात आमिरचा १५ मिनिटांचा कॅमिओ आहे. इतरही काही आगामी सिनेमात दिसेल.