Marathi News> मनोरंजन
Advertisement

पन्नाशी उलटली तरीही मराठमोळ्या अभिनेत्रीला नाही मिळालं मातृत्त्वाचं सुख; म्हणाली सरोगसीसाठी...

Bollywood Actress on Motherhood : मातृत्त्वाच्या प्रश्नावर अभिनेत्री भावूक; पन्नाशी उलटली तरीही आई न होण्याविषयी पहिल्यांदाच इतकं मोकळेपणानं बोलली...   

पन्नाशी उलटली तरीही मराठमोळ्या अभिनेत्रीला नाही मिळालं मातृत्त्वाचं सुख; म्हणाली सरोगसीसाठी...

Bollywood Actress on Motherhood : एखाद्या महिलेचं आयुष्य नेमकं किती आव्हानात्मक असतं हे अनेकदा पाहणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. पण, प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरी जाणारी महिला मात्र हे अगदी योग्यरितीनं जाणते. लहान मुलीपासून एक वयोवृद्ध महिला होईपर्यंतच्या प्रवासाच महिलांच्या जीवनात कैक टप्पे आणि वळणं येतात. त्यातलं एक वळण आणि या स्त्रीत्वाला नवं रुप देणारा टप्पा असतो तो म्हणजे मातृत्त्वाचा. 

नुकतंच एका अभिनेत्रीनं याच मातृत्त्वाविषयीचं तिचं मत व्यक्त करत एक भावनिक प्रतिक्रिया दिली आणि या संवेदनशील विषयानं पुन्हा डोकं वर काढलं. CID, 'कसम से' अशा मालिका आणि बॉलिवूड चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान करणारी ही मराठमोळी अभिनेत्री आहे अश्विनी काळसेकर. 

चित्रपट कारकिर्दीत अश्विनीनं कमाल यश संपादन केलं. पण, खासगी जीवनात मात्र तिच्यापुढं अनेक आव्हानं आली. 2009 मध्ये तिनं अभिनेते मुरली शर्मा यांच्याशी लग्नगाठ बांधली. नातं अतिशय सुरेखरित्या आकारास आलं पण, लग्नाला 15 वर्षे उलटूनही अश्विनीला मातृत्त्वाचं सुख मात्र मिळालं नाही. हल्लीक एका मुलाखतीदरम्यान तिनं आपण कधीच आई होऊ शकत नाही, याबाबतचा खुलासाही केला. 

हेसुद्धा वाचा : हजारो चाहत्यांचा घेराव अन् लपून बसलेली दीपिका; लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच समोर आला अभिनेत्रीचा Video

 

एका महिलेसाठी गर्भधारणेचा निर्णय अतिशय महत्त्वाचा असून, असं न झाल्यास त्या महिलेच्या मानसिक आरोग्यावर याचा थेट परिणाम होतो असं सांगताना अश्विनी पुढे म्हणाली, 'मी आणि मुरलीनं मुलांचा विचारही केला. किंबहुना आम्हाला बाळ हवं होतं. पण, मला किडनीचा त्रास आहे, ज्यामुळं कधीच माझी गर्भधारणा धाली नाही.'

fallbacks

सरोगसीचा पर्याय आणि पैसे... 

सरोगसी हा पर्याय तेव्हा इतका प्रचलित नसून,त्यावेळी आपल्याकडे तितके पैसेही नव्हते. त्यामुळं कारकिर्दीत तग धरला, संघर्ष केला आणि पुन्हा प्रयत्न केला. पण एका वळणार डॉक्टरांनीच तुझी किडनी बाळाचा भार सोसू शकत नाही असं स्पष्ट सांगितल्याची कटू आठवण अश्विनीनं सर्वांसमोर आणली. गर्भधारणेच्या प्रयत्नांदरम्यान बाळ किंवा आईला धोका असल्याचा इशारा अश्विनीला डॉक्टरांनी दिला आणि यानंतर तिनं आणि तिच्या पतीनं हा विचार सोडला. बऱ्याचदा हा नशीबाचा भाग असतो, असंच अश्विनी आता या परिस्थितीकडे पाहताना आवर्जून म्हणते. 

आपल्याला स्वत:ची मुलं नसली तरीही दोन पाळीव श्वानांचं मातृत्त्वं आपण स्वीकारल्याचं सांगत अश्विनीनं तिची आईपणाची परिभाषा सर्वांपुढे मांडली. 

Read More