Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिका, आलिया आणि श्रद्धाने का नाकारला आमिर खानचा 300 कोटींचा चित्रपट? अखेर आमिरनेच सांगितलं सत्य

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानच्या 300 कोटींच्या बिग बजेट चित्रपटासाठी दीपिका पदुकोण, आलिया भट्ट आणि श्रद्धा कपूर यांनी एकाच वेळी नकार दिला होता. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आमिरने या चित्रपटाच्या गुपितांवर उघडपणे भाष्य केले.

दीपिका, आलिया आणि श्रद्धाने का नाकारला आमिर खानचा 300 कोटींचा चित्रपट? अखेर आमिरनेच सांगितलं सत्य

Amir Khan: आमिर खानने आपल्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट दिले, जे प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले आहेत. सध्या त्याचा 'सितारे जमीन पर' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांतच 200 कोटींची जबरदस्त कमाई केली. मात्र काही वर्षांपूर्वी आमिरला त्याच्या सर्वात मोठ्या बजेट चित्रपटासाठी हिरोईन मिळवण्यासाठी फारच संघर्ष करावा लागला होता, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा चित्रपट तब्बल 300 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. 'धूम 3', 'पीके', 'दंगल' नंतर प्रेक्षकांना आणि निर्मात्यांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण 'ठग्स ऑफ हिंदोस्तानने' फक्त 150 कोटींची कमाई केली होती.

एका मुलाखतीत आमिर म्हणाला, 'या चित्रपटासाठी आम्ही मोठ्या अभिनेत्रींना विचारलं होतं, पण दीपिका, आलिया आणि श्रद्धा तिघींनीही नकार दिला. कदाचित त्यांना पटकथेत काहीतरी कमी वाटलं असावं किंवा काही संकोचही असावा.' याचवेळी विजय कृष्ण आचार्य आणि आदित्य चोप्रा यांनी फातिमा सना शेखला घेण्याचा विचार केला. पण तिने 'दंगल'मध्ये आमिरच्या मुलीची भूमिका साकारली होती, त्यामुळे आमिरसोबत तिचं रोमँटिक होणं प्रेक्षकांना पचेल का यावर शंका होती. आमिरने सांगितलं, 'मला वैयक्तिक पातळीवर हे काहीच अडचणीचं वाटलं नाही. आपण केवळ एक कथा सादर करत होतो. प्रत्यक्षात मी तिचा वडील नाही किंवा प्रियकर नाही. पण प्रेक्षकांच्या मनात गैरसमज होऊ नयेत म्हणून आम्हाला सावधगिरी बाळगावी लागली.' शेवटी ही भूमिका कतरिना कैफकडे गेली. तिने तिच्या ग्लॅमरस अंदाजात ही भूमिका साकारली. मात्र चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनाही तो फारसा भावला नाही.

हे ही वाचा: 'मला मारा, बांधून घेऊन जा...;' जेव्हा आमिर खानच्या सेटवर पोहोचले होते अंडरवर्ल्डचे लोक

चित्रपट फ्लॉप झाला यावर आमिर म्हणाला, 'मूळ कथा झफिरा बेगच्या सूडकथेवर आधारित होती आणि अमिताभ बच्चन यांचे पात्र मध्यंतरातच मरणार होते. त्यामुळे पुढील कथा नायिकेभोवती फिरली असती. पण स्क्रिप्टमध्ये अनेकदा बदल झाले, आदित्य आणि व्हिक्टर (विजय कृष्ण आचार्य) यांच्यासोबत तब्बल 6-8 महिने मी चर्चा करत होतो. त्यामुळे मूळ कल्पनेतच बदल झाला.' आमिरने पुढे सांगितले, 'कधीकधी आपण ठरवतो एक गोष्ट आणि प्रत्यक्षात घडतं काहीतरी वेगळंच. पण यातून शिकायला नक्कीच मिळालं.'

Read More