Neha Shitole: नेहा शितोळे मराठी सिनेसृष्टीतील एक दमदार अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. अभिनयासोबत ती लेखनही करते, ज्यातून तिच्या विचारशीलतेची प्रचिती येते. सध्या ती कलर्स मराठीवरील 'अशोक मा. मा.' या मालिकेत झळकत असून प्रेक्षक तिच्या भूमिकेला भरभरून दाद देत आहेत. नेहा शितोळेने नुकतेचं सुमन म्युझिकला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आरोग्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आणि आपले मन मोकळे केले.
मन मोकळं करताना नेहा म्हणाली
'माझ्या आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते की जेव्हा मला खूप राग येतो किंवा रडू येतं. अशा वेळी मी थेरपिस्टकडे गेले होते. त्यांनी मला माझ्याच भाषेत काही गोष्टी समजावून सांगितल्या. त्या म्हणायच्या की, 'मी तुला आता जवळ घेऊन शांत करणार नाही. मला हे महत्त्वाचं वाटतं की तू पुन्हा या गोष्टींसाठी रडू नये.' त्या वेळेस आपल्याला कधीकधी कडक शब्दही ऐकायला हवेत, कारण फक्त जवळ घेऊन सांत्वन केलं तर ते दु:ख क्षणभर कमी होतं, पण ते कायमचं दूर होत नाहीत.'
पुणेकर झोपतात यामागचं गमतीशीर लॉजिक
नेहा पुढे म्हणाली, 'माझा अजून एक उपाय म्हणजे मी झोप घेते. म्हणजे आय स्लिप ओव्हर थिंग्स. झोप घेतल्यावर शरीर आणि मन दोन्ही शांत होतं. बर्याचदा उठल्यावर काय झालं होतं त्याची आठवणही राहत नाही. पुणेकरांना झोप इतकी प्रिय आहे याचं कारण मला आता कळायला लागलंय. कारण ते दुपारी 1 ते 4 झोप घेतात आणि त्यानंतर नवीन जोमाने कामाला लागतात.'
हे ही वाचा: 'या' अभिनेत्रींचा रुपेरी पडद्यावर वडील-मुलासोबत रोमान्स; पाहा कलाकारांची यादी
तिच्या या साध्या सवयीमधून मोठा संदेश
नेहाच्या या गोष्टीवरून एक साधा पण महत्त्वाचा धडा मिळतो- मनावर आलेला ताण, दुःख किंवा राग याला दाबून न ठेवता, ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे व्यक्त करणे किंवा शांत झोप घेणे, हे मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक असते.
नेहा शितोळेने सांगितल्या प्रमाणे पुणेकरांना झोप प्रिय असते. मात्र, आपण फक्त ते विनोदात म्हणतो. नेहाच्या आरोग्यासाठी आणि ताजेतवाने राहण्यासाठी हेचं एक मोठ्ठं गुपित असावं.