Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन रेखा यांना आई म्हणून का हाक मारते?

अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी आजही चर्चेचा विषय ठरतं. 90च्या दशकात दोघांनी अनेक चित्रपट एकत्र काम केले. मात्र त्यांच्या नात्याबद्दल कोणीच कधीच स्पष्ट बोलेलं नाही. आज हे दोघं एकमेकांशी बोलत नसले तरी अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि रेखा यांचं नातं मात्र अतिशय घट्ट आणि प्रेमळ असल्याच पाहिला मिळतं.

अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन रेखा यांना आई म्हणून का हाक मारते?

Aishwarya Rai and Rekha Mother Daughter Relationship: अमिताभ बच्चन आणि रेखा यांची लव्ह स्टोरी कायम चर्चेत असली तरी दोघांनीही त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या व्यक्तींशी लग्न केलंय. ते दोघेही एकमेकांचा कायम आदर करताना पाहायला मिळतात. त्या दोघांनी 90च्या दशकात अनेक चित्रपटात एकत्र काम केले. 'सिलसिला' या चित्रपटात अमिताभ आणि रेखाची यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आता ते दोघे एकत्र नसले तरी सुद्धा अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय बच्चन ही नेहमीच रेखा यांच्या सोबत दिसते. ऐश्वर्या रेखाबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करताना दिसते. अनेकदा ती रेखासोबत रेड कार्पेट इव्हेंट्सना हजर राहते. तिला विशेष प्रसंगी शुभेच्छा देते किंवा तिच्याशी प्रेमाने बोलते.

ऐश्वर्या अनेकदा रेखाला 'आई' म्हणून बोलावते. ऐश्वर्याचं रेखावर प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्यात एक खास जिव्हाळ्याचं नातं आहे. विशेष म्हणजे दोघीही दक्षिण भारतातील आहेत. दक्षिण भारतात एक परंपरा आहे. जिथे मोठ्या महिलांना आदराने 'आई' म्हणून संबोधले जाते. कदाचित त्यामुळेच ऐश्वर्या रेखाला प्रेमाने 'आई' म्हणते आणि रेखाही तिला तितक्याच प्रेमाने स्वीकारते.

हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, जेव्हा ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण केली होती. तेव्हा रेखाने तिला एक खास पत्र लिहिलं होतं. हे पत्र 'फेमिना'च्या 2018 च्या आवृत्तीत प्रसिद्ध झालं होतं. त्या पत्रात रेखाने स्वतःला ऐश्वर्याची 'आई' म्हणून संबोधलं होतं.

हे ही वाचा: एआर रहमानला दिल्ली हायकोर्टानकडून कोट्यावधींचा दंड; 'वीरा राजा वीरा' च्या कॉपीराइटचा आरोप

त्या पत्रात रेखाने लिहिलं होतं

'माझ्या ऐशसाठी, जी स्वतःच्या आत्म्याशी एकरूप आहे. अशी स्त्री सतत वाहणाऱ्या नदीसारखी असते, कधीही थांबत नाही. अनेक संकटांचा सामना करूनही तू पुन्हा उभी राहतेस! तुझ्यावर मला जितका अभिमान आहे, ते शब्दांत सांगणं कठीण आहे. जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा तू माझा श्वास रोखला होतास. ऐश्वर्या राय बच्चनची दोन दशके- व्वा! मी तुला मनःपूर्वक आशीर्वाद देते आणि तुझ्या हृदयासारखं विशाल प्रेम तुला लाभो, अशी प्रार्थना करते. रेखा माँ.'

Read More