Marathi News> मनोरंजन
Advertisement

1600 कोटींच्या भव्य 'रामायण'मध्ये रणबीर प्रभू श्रीराम का? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

रामायण चित्रपटात प्रभू श्रीराम यांची भूमिका रणबीर कपूर साकारत आहे. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे काही प्रेक्षक नाराज झाले असले तरी त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत रणबीरची निवड का केली, हे स्पष्टपणे सांगितले आहे.

1600 कोटींच्या भव्य 'रामायण'मध्ये रणबीर प्रभू श्रीराम का? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

Ramayana: रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्या मुख्य भूमिकांमुळे 'रामायण' हा चित्रपट रिलीजपूर्वीच प्रचंड चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला लूक देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसत आहे. या पोस्टरमधील भव्य पार्श्वभूमी, सूर्य आणि ढगांचे दृश्य पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. हा चित्रपट दोन भागांत येणार असून, पहिला भाग 2026 मध्ये आणि दुसरा 2027 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल. चित्रपटासाठी सुमारे 1600 कोटींचं बजेट असणार आहे. हा आजवरचा सर्वात मोठा भारतीय पौराणिक सिनेमा ठरण्याची शक्यता आहे. एका सेटसाठीच जवळपास 11 कोटी खर्च केल्याचे समजते.

या चित्रपटात साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत, तर केजीएफ फेम यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहेत. याशिवाय सनी देओल- हनुमान, रवी दुबे- लक्ष्मण, रकुल प्रीत सिंह- शूर्पणखा, काजल अग्रवाल- मंदोदरी आणि लारा दत्ता- कैकेयी या भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शक नितेश तिवारी आणि निर्माता नमित मल्होत्रा यांच्या या प्रकल्पाकडे प्रेक्षक मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी कमेंट करत म्हटलं की, 'यशने रावण नव्हे तर रामाची भूमिका करायला हवी होती.' मात्र, यावर यशने एका मुलाखतीत स्पष्टीकरण देताना सांगितले की, 'रावणाचं पात्र मला खूपच आकर्षित वाटलं. जर मला रामायणातील इतर कोणतीही भूमिका करायला सांगितली असती, तरी मी ती केली नसती.'

हे ही वाचा: 1000 कोटींच्या यशानंतर रश्मिकाला मिळाला आणखी एक मेगा बजेट चित्रपट, साकारणार बोल्ड भूमिका

रणबीर कपूरलाचं राम म्हणून का निवडलं?

2024 मध्ये रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी या कास्टिंगबद्दल सांगताना म्हटलं, 'रणबीरच्या चेहऱ्यावर एक निरागसता आहे, एक शांतता आहे. त्याच्या आतलं मूल दिसून येतं. प्रभू श्रीरामांसारख्या दिव्य, सर्वमान्य व्यक्तिमत्त्वासाठी हे गुण अत्यंत आवश्यक होते.' त्यांनी पुढे रणबीरच्या अभिनय कौशल्याचं कौतुक करत म्हटलं, 'रणबीर अभिनयात प्रचंड नैसर्गिक आहे. तुम्ही त्याला अभिनयात हरवू शकत नाही. त्याला हिट किंवा फ्लॉपची अजिबात फिकीर नसते. तो आपल्या विश्वातच रममाण होऊन फक्त अभिनयावर लक्ष केंद्रित करतो.'

या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज होताच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धुमाकूळ घातला. प्रेक्षक आता या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी जगातील सर्वोत्तम स्टुडिओंशी करार करण्यात आला आहे. तसेच संगीतासाठीही नामवंत संगीतकारांशी चर्चा सुरू आहे.

Read More