Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sidharth Shukla Death : सिद्धार्थ मृत्यूनंतर सुशांत सिंग राजपूत का होतोय ट्रेन्ड?

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर लोकांनी सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा दिलाय.

Sidharth Shukla Death : सिद्धार्थ मृत्यूनंतर सुशांत सिंग राजपूत का होतोय ट्रेन्ड?

मुंबई : बी-टाऊन इंडस्ट्रीसाठी कालचा दिवस फार कठीण होता. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने वयाच्या 40 व्या वर्षी अकाली एक्झिट घेतल्याने प्रत्येकाला धक्का बसला आहे, हृदयविकाराच्या झटक्याने काल सिद्धार्थचं निधन झालं आहे. मुंबईतील कूपर रूग्णालयातील डॉक्टरांनी सिद्धार्थला मृत घोषित केलं. सिद्धार्थच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थच्या मृत्यूनंतर लोकांनी सुशांत सिंग राजपूतच्या आठवणींना उजाळा दिलाय. 

यावेळी सिद्धार्थच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर #SushantSinghRajput असा ट्रेन्डही पहायला मिळाला. गेल्यावर्षी 14 जून रोजी बांद्र्यातील घरात सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान त्याच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही. सुशांतचं पोस्टमार्टम कूपर रूग्णालयात केलं गेलं. तर सिद्धार्थच्या मृत्यूनंतरही त्याला कूपर रूग्णालयात नेण्यात आलं.

fallbacks

फॅन्स सुशांत आणि सिद्धार्थची करतायत तुलना

सोशल मीडियावर फॅन्स सिद्धार्थ शुक्ला आणि सुशांत सिंग राजपूतची तुलना करताना दिसतायत. फॅन्सच्या म्हणण्याप्रमाणे, दोघांनाही एकाच रूग्णालयात नेण्यात आलं तसंच दोघेही अभिनेते प्रचंड हुशार आणि टॅलेंटेड होते. इतकंच नव्हे तर दोघंही आउटसाइडर्स होते आणि त्यांनी टीव्हीपासून बॉलीवूड इंडस्ट्री पर्यंत प्रवास केला.

सिद्धार्थ आणि सुशांत दोघांचेही सोशल मीडियावर मोठे फॅन फोलोव्हिंग होतं. शिवाय दोघंही फिटनेससंदर्भात जागरूक होते. दोघांचंही करियर पीक वर असताना हे दोघंही जग सोडून गेले. 

मुंबई पोलिसांच्या सूत्रानुसार, सिद्धार्थच्या शरीरावर कोणत्याही जखमा दिसून आल्या नाहीत. सिद्धार्थच्या घरी तपासणीसाठी पोलिसांचं एक पथक उपस्थित आहे. सिद्धार्थ शुक्लाने बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी काही औषधे घेतली होती. मात्र तो सकाळी उठलाच नाही. निधनानंतर सिद्धार्थ शुक्लाचं पोस्टमार्टम केलं गेलं. आज शुक्रवारी सिद्धार्थ शुक्लावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. 

Read More