Marathi News> मनोरंजन
Advertisement

...यासाठी मराठी कलाकार पोस्ट करतात आपल्या लग्नाचे फोटो

सध्या सोशल मीडियावर एक हटके ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. 

...यासाठी मराठी कलाकार पोस्ट करतात आपल्या लग्नाचे फोटो

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एक हटके ट्रेन्ड पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर मराठी कलाकार आपल्या लग्नाचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. हा ट्रेन्ड सुरू होण्यामागचं कारण म्हणजे झी मराठीवर सुरू झालेली नवी मालिका. 

झी मराठीवर 'मिसेस मुख्यमंत्री' ही नवी मालिका सुरू झाली आहे. मालिकेत आता सुमी-समरच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. नुकतंच या दोघांच प्री-वेडिंग झालं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. मालिकेतील समर-सुमीने मराठी कलाकारांना आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं चॅलेंज दिलं आहे. 

हेच चॅलेंज मराठी कलाकारांनी देखील अगदी आनंदाने स्विकारलं असून सोशल मीडियावर हा ट्रेन्ड सुरू केला आहे. मराठी कलाकारांनी आपल्या लग्नाचे फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

पाहूयात मराठी कलाकारांचे फोटोज...

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

मंडळी तुमच्या लाडक्या कलाकारांनी समर-सुमीच्या लग्नानिमित्त सुरु झालेलं हे अनोखं challenge स्वीकारलंय. तुम्हीसुद्धा #MrsMukhyamantri #Muhurtachukavunaka #22ndseptember #7pm #sumisamarlagna #shubhalagnasavadhan #saatchamuhurta #zeemarathi #zeemarathiofficial हे सर्व # वापरून आपला एक Couple फोटो Instagram वर अपलोड करा आणि आपल्या ओळखीतील व्यक्तींना nominate करून या challenge ची साखळी अशीच पुढे न्या. बाकी मुहूर्त चुकवायचा नाही २२ सप्टेंबर संध्या. ७ वा. @tejas.barve_ @amrutadhongadeofficial

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

राधिकाचं चॅलेंज स्विकारुन सौमित्रने देखील टाकलाय हा त्याच्या लग्नातला फोटो. आम्हाला तुमच्या लग्नातले फोटो देखील पाहायला आवडतील बरं का. #MrsMukhyamantri #Muhurtachukavunaka #22ndseptember #7pm #sumisamarlagna #shubhalagnasavadhan #saatchamuhurta #zeemarathi #zeemarathiofficial #SamarWedsSumi #ZMFamilyWedding #MuhurtOn22September हे सर्व # वापरून आपला एक Couple फोटो अपलोड करा आणि आपल्या ओळखीतील व्यक्तींना nominate करून या challenge ची साखळी अशीच पुढे न्या. बाकी मुहूर्त चुकवायचा नाही २२ सप्टेंबर संध्या. ७ वा. @tejas.barve_ @amrutadhongadeofficial

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

झी मराठीवर काही दिवसांपूर्वीच 'मिसेस मुख्यमंत्री' ही मालिका सुरू झाली आणि अगदी कमी वेळात या मालिकेने प्रेक्षकांच मन जिंकल आहे. या मालिकेतील प्रमुख पात्र समर आणि सुमी यांच्या लग्नाची लगबग सध्या मालिकेत पाहायला मिळत आहे. 

मालिकेत सुमीची भूमिका अभिनेत्री अमृता धोंगडे तर पायलट समरची भूमिका अभिनेता तेजस बर्वे साकारत आहे. तेजस आणि अमृताची जोडी प्रेक्षकांनी पसंद केली आहे. या दोघांच अनोख्या पद्धतीने सुरू झालेलं हे नातं आता लग्नबंधनात अडकणार आहे. २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता समर-सुमी लग्नगाठ बांधणार आहेत. तर हा विशेष एपिसोड पाहायला विसरू नका. 

Read More