Nysa Devgan : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची लेक नीसा देवगण ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. नीसा हे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. नीसानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं नसलं तरी तिच्या आउटिंग आणि मूव्ही नाइट्सचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधत असतात. नीसाला पाहिलं की पापाराझी देखील तिचे फोटो आणि व्हिडीओ काढताना दिसतात. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलनं नीसाला या सगळ्या मिळणाऱ्या अटेन्शनविषयी चिंता व्यक्त केली आहे. तर त्याशिवाय वीना सिक्योरिटीशिवाय कुठे बाहेर जाऊ देत नाही. तिला त्याची परवानगी नाही.
काजोलनं एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत काजोलनं या सगळ्यावर वक्तव्य केलं आहे. सगळ्यात आधी ती नीसाला मिळालेल्या अटेन्शनमुळे त्रास होतो का या विषयी बोलताना म्हणाली, 'हो परिणाम होतो, पण आता जास्त काही वाटतं नाही. तिला हवं तिथे ती जाऊ शकत नाही. कोण कधी तिचा पाठलाग करेल याविषयी तुम्ही काही सांगू शकत नाही.'
काजोलनं पुढे सांगितलं की तिची मुलगी खूप छोटी होती. तेव्हा पासून पापाराझी कॅप्चर करतात. तिला मुळीच हे आवडत नाही. काजोल म्हणाली, 'जेव्हा ती 14 किंवा 15 वर्षांची असेल तेव्हापासून ते तिचे फोटो क्लिक करत आहेत. हे योग्य आहे असं मला वाटत नाही. 18 वर्षांचे होईपर्यंत ते मुलं असतात. जर त्यांनी इंडस्ट्री निवडल नाही आणि फक्त जेनेटिक कोडमुळे ते फक्त तिथे आहेत. तर त्यांना त्यांचं स्वातंत्र्य हे मिळायला हवं.'
काजोलनं आणखी एका मुलाखतीत तिच्या मुलीसोबत तिचं नातं कसं आहे याविषयी सांगितलं. तिनं सांगितलं की त्यांचं आई आणि मुलीचं नात असलं तरी त्यांचं नातं हे मैत्रीचं आहे. तिनं सांगितलं की ती तिच्या दोन्ही मुलांची अर्थात नीसा आणि युगची मैत्रिण होण्याचा प्रयत्न करत आहे. तिला तिच्या मुलांसोबत जास्त स्ट्रिक्ट व्हायचं नाही. या सगळ्याविषयी चर्चा करत असताना काजोलनं सांगितलं की ती नेहमीच मुलगी नीसा देवगणला सांगते की जेव्हा ती स्वत: आई होईल ना, तेव्हा तिला कळेल की आई झाल्यावर काय होतं. त्यातही एका मुलीचं आई होणं काय असतं.
पुढे काजोलनं हे देखील सांगितलं की तिची मुलगी नीसाला मुलगी नाही तर मुलांची आई व्हायचं आहे. नीसाला वाटतं की मुलांची आई होणं अर्थात त्यांचा सांभाळ करणं हे सोपं असतं.
काजोलचा पहिला हॉरर चित्रपट 'मा' हा 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अजय देवगणनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर कालोज महत्त्वाच्या भूमिकेत असून रोनित रॉय, इंद्रनील सेनगुप्ता आणि यानीआ भारद्वाज महत्त्वाच्या भूमिकेत आहे.