Marathi News> मनोरंजन
Advertisement

असं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही

बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मात्र सलमान खानने कोणतेही ट्वीट केले नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह राहणारा सलमानने श्रीदेवीच्या निधनानंतर मात्र कोणतेची ट्विट केले नाही. 

असं काय झालं की सलमानने श्रीदेवीबाबत ट्विट केले नाही

मुंबई : बॉलीवूडची हवाहवाई गर्ल श्रीदेवीच्या अचानक जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन श्रीदेवीला श्रद्धांजली वाहिली. मात्र सलमान खानने कोणतेही ट्वीट केले नाही. सोशल मीडियावर बऱ्यापैकी अॅक्टिव्ह राहणारा सलमानने श्रीदेवीच्या निधनानंतर मात्र कोणतेची ट्विट केले नाही. 

सलमानने केले नाही ट्वीट

सलमानचे श्रीदेवीशी चांगले बॉन्डिंग होते. सलमानला आपली पर्सनल लाईफ सोशल मीडियावर शेअर करायला आवडत नाही. यामुळेच त्याने याबाबत कोणतेही ट्विट केले नाही. सलमानच्या मते जवळच्या व्यक्तीला गमावण्याचे दु:ख अशाप्रकारे व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळेच त्याने ट्विट केले नसावे. 

श्रीदेवीचे पार्थिव मुंबईत आणल्यानंतर सलमानने लोखंडवाला स्थित त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली होती. यावेळी श्रीदेवीचे पार्थिव पाहून सलमानलाही अश्रू अनावर झाले. 

सलमान आणि श्रीदेवीने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले होते. मात्र अभिनयाव्यतिरिक्त पेंटिंगची आवड दोघांनाही होती. 

Read More