Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून श्रीदेवी शिकवत होत्या मुलीला बाईक

श्रीदेवी यांच्या अचानक मृत्यूमुळे बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. कपूर कुटुंबिय देखील या सदम्यातून आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.

...म्हणून श्रीदेवी शिकवत होत्या मुलीला बाईक

मुंबई : श्रीदेवी यांच्या अचानक मृत्यूमुळे बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. कपूर कुटुंबिय देखील या सदम्यातून आता बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.

श्रीदेवी शिकवत होत्या बाईक

काही दिवसांपासून श्रीदेवींचा मुलगी जान्हवीला बाईक शिकवतांनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जान्हवी बाईक शिकत असताना श्रीदेवी या तिच्या सोबत तिच्या मागे बसल्या होत्या. पण जान्हवी एका विशेष कारणासाठी बाईक शिकत होती. ते विशेष कारण काय होतं हे आज तुम्हाला सांगणार आहोत.

जान्हवी का शिकतेय बाईक?

सैराट सिनेमाचा हिंदी रिमेक लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमामध्ये अर्चीची भूमिका जान्हवी कपूर करते आहे. त्यामुळे अर्चीने ज्या प्रकारे सिनेमात बुलेट चालवली होती त्या प्रकारे जान्हवीला देखील या सिनेमात बाईक चालवावी लागणार आहे. 

 

 

Bike practice for #Dhadak #sridevikapoor #janhvikapoor

A post shared by ishjaan (@dhadak_ishaanjanhvi) on

fallbacks

सिनेमाचं शूटींग सुरु

श्रीदेवीच्या अकाली मृत्यूमुळे ही शूटिंग काही आठवड्यांपर्यंत थांबविण्यात आली होती. गेल्या आठवड्यातच जान्हवीने चित्रपटाच्या शूटिंग सुरु केले होते. करण सेटवर सहज सोयीस्कर असं वातावरण बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे ज्यामुळे जान्हवीला काही अडचण होणार नाही. चित्रपट २० जुलै २०१८ ला रिलीज होणार असल्याचं देखील सूत्रांनी म्हटलं आहे.

Read More