Marathi News> मनोरंजन
Advertisement

पुन्हा दिसणार 'टिप टिप बरसा...'ची जादू

'टिप टिप बरसा पानी' पुन्हा नव्या रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला

पुन्हा दिसणार 'टिप टिप बरसा...'ची जादू

मुंबई : पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये पावसात भिजताना अभिनेत्री रवीना टंडनने 'टिप टिप बरसा पानी' या गाण्याने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ पाडली होती. रवीना टंडन आणि अभिनेता अक्षय कुमार यांचं गाणं 'टिप टिप बरसा पानी' आजही बॉलिवूडमधील सर्वात रोमँटिक गाण्यांपैकी एक आहे. १९९४ मध्ये आलेल्या 'मोहरा' चित्रपटातील हे रोमँटिक गाणं आता पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर आगामी 'सूर्यवंशी' चित्रपटातून 'टिप टिप बरसा पानी' हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे. बहुचर्चित 'सूर्यवंशी' चित्रपटासाठी या गाण्याचं शूटिंगही सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. 

'डीएनए'ने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमार आणि कतरिना कैफ 'टिप टिप बरसा पानी' या हिट गाण्याचं रीक्रिएटेड वर्जनचं शूटिंग करत आहेत. गुरुवारी अक्षय आणि कतरिना रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. 

fallbacks

एका रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच या गाण्याचं शूटिंग करण्यात आलं आहे. याशिवाय अक्षय आणि कतरिना हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रपटासाठी अनेक हाय टेक्निक अॅक्शन सीन्सचंही शूटिंग करणार आहे. 

CONFIRM: रोहित शेट्टी की टीम में शामिल हुईं कैटरीना कैफ, लेंगी 'सूर्यवंशी' गर्ल का अवतार

'सूर्यवंशी' २७ मार्च २०२० मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता या गाण्यातील रवीना टंडनप्रमाणेच कतरिना कैफ कमाल करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read More