Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : लग्नासाठी दीप-वीर इटलीला रवाना

इटलीत १४ नोव्हेंबर रोजी विवाह दक्षिण भारतीय परंपरेनुसार पार पडेल तर १५ नोव्हेंबर रोजी सिंधी समाजाच्या परंपरेनुसार... 

व्हिडिओ : लग्नासाठी दीप-वीर इटलीला रवाना

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नांचा सीझनच सुरू आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटिंनी आपल्या खाजगी आयुष्याला प्राधान्य देत विवाहाचा निर्णय घेतलाय. लवकरच अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण विवाहबंधनात अडकणार आहे. या लग्नाला केवळ चार दिवस उरलेत... १४ आणि १५ नोव्हेंबरला या जोडप्याचं विवाहाचं आयोजन इटलीच्या लेक कोमो इथं करण्यात आलंय. अशावेळी रणवीर सिंह आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत दीपिका पादूकोण मुंबई विमानतळावर दिसले. 

यावेळी होणारे वधु-वर सफेद रंगाच्या ड्रेसमध्ये दिसले. दोघांना पाहून त्यांनी आत्तापासूनच जोडप्याप्रमाणे ठरवून ड्रेस परिधान करण्याचं ठरवल्यासारखं दिसलं. इतकंच काय तर हे दोघं ज्या गाडीतून आले तीदेखील सफेद रंगाचीच होती. 

तर रणवीरच्या वडिलांनी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.

रणवीर आणि दीपिका यांचा विवाह इटलीच्या लेक कोमोमध्ये आयोजित करण्यात आलाय. कारण रणवीर हा सिंधी समाजातून आहे तर दीपिका दक्षिण भारतीय... हेच ध्यानात घेता या दोघांनी दोन वेगवेगळ्या पद्धतींनी विवाह करण्याचा निर्णय घेतलाय. 

इटलीत १४ नोव्हेंबर रोजी विवाह दक्षिण भारतीय परंपरेनुसार पार पडेल तर १५ नोव्हेंबर रोजी सिंधी समाजाच्या परंपरेनुसार... 

या विवाहासाठी कुटुंबाशिवाय काही मोजक्याच मित्रांसह जवळपास केवळ ३० जणांना आमंत्रण दिलं गेलंय. यातील कुणालाही विवाहाच्या ठिकाणी मोबाईल फोन आत नेण्यास परवानगी दिली जाणार नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहानंतर रणवीर आणि दीपिकानं २३ नोव्हेंबर रोजी बंगलोरमध्ये भव्य रिसेप्शनचंही आयोजन केलंय. यामध्ये अनेक बॉलिवूड मंडळी सहभागी होतील. 

fallbacks

२०१४ साली आलेल्या संजय लीला भन्साळी यांच्या राम-लीलाच्या सेटवर या दोघांच्या प्रेमाला सुरूवात झाली होती. फॅन्सनं या जोडीला 'दीप-वीर' असं नाव दिलंय. या दोघांनी  'गोलियों की रासलीला: रामलीला', 'बाजीराव मस्तानी' आणि 'पद्मावत' या सिनेमांत एकत्र काम केलंय. 

Read More