Marathi News> मनोरंजन
Advertisement

१० दिवसात 'मणिकर्णिका' सिनेमाने जमवला एवढ्या रुपयांचा गल्ला

सिनेमा प्रदर्शित होवून दहा झाले आहेत तरीही चाहत्यांमध्ये सिनेमाचा क्रेझ मात्र पहिल्या दिवसा प्रमाणेच आहे.

१० दिवसात 'मणिकर्णिका' सिनेमाने जमवला एवढ्या रुपयांचा गल्ला

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौत स्टारर सिनेमा 'मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी' बॉक्सऑफिसवर चांगलीच मजल मारताना दिसत आहे. प्रजासत्तक दिनाच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या सिनेमाची चर्चा अजुनही रंगत आहे. सिनेमातील कंगणाचे अभिनय चाहत्यांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. सिनेमा प्रदर्शित होवून दहा झाले आहेत तरीही चाहत्यांमध्ये सिनेमाचा क्रेझ मात्र पहिल्या दिवसा प्रमाणेच आहे. आता पर्यंत रानी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची गाथा प्रेक्षकांनी फक्त छोट्या पडद्यावर अनुभवली होती. २०१९ मध्ये कंगणाने तिच्या दमदार अभिनयाने या धडसी पराक्रमाच्या यशोगाथेला मोठ्या पडद्यावर आणले.

 

चाहत्यांनी आणि समीक्षकांनी सिनेमाला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. सिनेमा समीक्षक तरण आदर्श यांनी सांगितल्याप्रमाणे 'मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी' सिनेमाने पाच दिवसात ५० कोटी रुपयांचा आकडा पार केला होता. तर सिनेमाने दहा दिवसांमध्ये बॉक्सऑफिसवर तब्बल ७६.६५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दिवसेंदिवस चढत्या क्रमावर पोहचणारा सिनेमा १०० कोटीं रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २५ जानेवरी रोजी सिनेमागृहात दाखल झालेल्या सिनेमात कंगणा व्यतिरिक्त अतुल कुलकर्णी, जिशु सेनगुप्ता, सुरेश ऑबेरॉय, डैनी आणि अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

राधा कृष्ण, जगरलामुडी आणि कंगणा राणौत यांच्या दिग्दर्शनाखाली साकारण्यात आलेला सिनेमा 'मणिकर्णिका: द क्‍वीन ऑफ झांसी' हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

Read More