Ameesha Patel Net Worth : बॉलिवूडमधील अभिनेत्री अमीषा पटेलनं 2000 मध्ये हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या इंडस्ट्रीमध्ये तिला 23 वर्ष झाली असून तिनं या काळात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अमीषा ही लोकप्रिय अभिनेत्री असून तिचे फक्त भारतात नाही तर परदेशात देखील लाखो चाहते आहेत. आज 9 जून रोजी अमीषा तिचा 49 वा वाढदिवस साजरा करते. अमीषा आता जास्त चित्रपटात दिसत नाही. तरी ती आलिशान आयुष्य जगते. चला तर तिची एकूण नेटवर्थ किती आहे त्याविषयी जााणून घेऊया.
अमीषा पटेल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सनी देओलसोबत त्याच्या हिट असलेल्या 'गदर' या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये म्हणजे 'गदर 2' मध्ये दिसली. रिपोर्ट्सनुसार, अमीषा पटेलची एकूण नेटवर्थ ही सीए नॉलेजच्या रिपोर्ट्सनं दिल्यानुसार, 32 मिलियन डॉलर याचाच अर्थ 2,65,04,00,000 आहे. अमीषा आलिशान आयुष्य जगते. अमीषाला कार प्रचंड आवडतात आणि तिच्याकडे चांगलं कलेक्शन देखील आहे. ज्यात रेंज रोवर, मर्सिजीज आणि ऑडी सारख्या गाड्या आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये अमीषाच्या नेटवर्थमध्ये चांगली वाढ झाली आहे. एकीकडे 2018 मध्ये तिची नेटवर्थ ही 20 मिलियन डॉलर होती. तर 2019 मध्ये ती वाढून 22 मिलियन डॉलर होती. तर 2020 मध्ये यात वाढ होऊन ती 24 मिलियन डॉलर झाली. त्यानंतर 2021 मध्ये ही वाढून 26 मिलियन डॉलर झाली आणि 2022 मध्ये 29 मिलियन डॉलर झाली.
अमीषा पटेल दर महिन्याला जवळपास 2 कोटी रुपये कमावते आणि रिपोर्ट्सनुसार 'गदर 2' साठी तिनं मानधन म्हणून 50 लाख रुपये घेतले होते. 'बॉलिवूड हंगामा' ला दिलेल्या मुलाखतीत अमीषा पटेलनं तिच्या बॅग कलेक्शनची एक झलक दाखवली होती. अमीषानं सांगितलं की तिच्या कलेक्शनमध्ये सगळ्यात महागडी बॅग तिची हर्मीस बिर्किन आहे आणि तिनं सांगितलं की त्या बॅगला देऊन कोणीही एक घर घेऊ शकतो. याचा अर्थ त्या बॅगच्या किंमतीत कोणीही घर खरेदी करू शकतात.
हेही वाचा : EX रवीना टंडनची लेक राशाला पाहताच अक्षयनं केलं असं काही... VIDEO होतोय VIRAL
पुढे तिच्या बिर्किन बॅगच्या कलेक्शनविषीय बोलचाना अमीषानं सांगितलं की तिच्या बिर्किन बॅगची किंमत जवळपास 60-70 लाख आहे आणि ही बॅग स्वस्तात आहे जी रिहाना आणि विक्टोरिया बेकहम सारख्या लोकप्रिय सेलिब्रिटींकडे आहे.
अमीषाचं नाव तिच्या वडिलांचं नाव अमित आहे त्यातून पहिलं आणि दुसरं अक्षर आणि आईचं नाव आशा त्यातून शा हे घेत अमीषा नाव ठेवलं. अमीषा पटेलचा जन्म गुजराती कुटुंबात झाला. दादा रजनी पटेल एक प्रसिद्ध वकील आणि राजकारणी होते. ते मुंबई प्रदेश कॉंग्रेस कमेंटीचे प्रमुख होते.