Marathi News> मनोरंजन
Advertisement

WWE स्टार ब्रॉन स्ट्रोमॅन अभिनेता वरूण धवनचा नवा जीम पार्टनर

स्ट्रोमॅनला भेटण्यासाठी चाहत्यांनी मुंबईत गर्दी केली होती.

WWE स्टार ब्रॉन स्ट्रोमॅन अभिनेता वरूण धवनचा नवा जीम पार्टनर

मुंबई: भारतात लोकप्रिय असला तरी आतापर्यंत विदेशातच खेळला जाणारा डब्ल्यूडब्ल्यूई हा खेळ भारतातही आपले हातपाय पसरत आहे. गेल्याच वर्षी इंदिरा गांधी स्टेडियमध्ये डब्ल्यूडब्ल्यूईचा लाईव्ह इव्हेंट करण्यात आला होत. या इव्हेंटला भरतीय चाहत्यांनीही जोरदार प्रतिसाद दिला. या इव्हेंटला डब्ल्यूडब्ल्यूई स्टार रेसलर स्ट्रॉमॅनही आला होता. पण, तो फार काळ थांबला नव्हात. दरम्यान, स्ट्रॉमॅनने आपण पुन्हा एकदा भारतात येण्याचे अश्वासन दिले होते. त्यानुसार तो पुन्हा एकदा भरतात आला. १९ जुलैला तो मुंबईत पोहोचला. त्याला भेटण्यासाठी मुंबईतील चाहत्यांनी गर्दी केली होती. दरम्यान, या वेळी बॉलिवूडचा अभिनेता वरून धवननेही स्ट्रॉमेनची भेट घेतली. दोघे जीममध्ये भेटले आणि जीममध्येच दोघांनी संवाद साधला.

 'वरूनचा नवा जीम पार्टनर'

दरम्यान, वरून धवना आणि स्ट्रोमॅन जीममध्ये सोबत एक्सरसाइज करताना दिसले. डब्ल्यूडब्ल्यूईनेही आपल्या सोशल मीडिया पेजवर दोघांची छायाचित्रे पोस्ट करत लिहले आहे 'वरूनचा नवा जीम पार्टनर'. वरून धवनने जे छायाचित्र पोस्ट केले आहे त्यात दोघेही भारताला अभिवादन करताना दिसतात. दोघांनी आपला आनंद इन्स्टाग्रामवर शेअर केला.

 

It seems @varundvn has a new gym partner in @adamscherr99! #IndiaWelcomesBraun

A post shared by WWE India (@wweindia) on

वरून धवन द रॉकचा मोठा फॅन

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता वरून धवन डब्ल्यूडब्ल्यूईचा जबरदस्त फॅन आहे. गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या डब्ल्यूडब्ल्यूईच्या लाईव्ह इव्हेंटमध्ये एका सामन्याचा अॅंकर वरून धवन होता. खरे तर वरून धवन द रॉकचा मोठा फॅन आहे. 

Read More