Marathi News> मनोरंजन
Advertisement

करण जोहरच्या वडिलांच्या 'या' गोष्टी माहित आहेत का?

सिनेमा बनवण्या आधी करत होते हे काम 

करण जोहरच्या वडिलांच्या 'या' गोष्टी माहित आहेत का?

मुंबई : फिल्म मेकर करण जोहरचे वडिल आणि प्रोड्युसर यश जोहर यांचा जन्म 6 सप्टेंबर 1929 मध्ये लाहोरमध्ये झाला. त्यांच्या सिनेमातील वेगळेपण म्हणजे भव्य सेट आणि परदेशातील लोकेशन्स. यश जोहरने 'कल हो ना हो', 'कुछ कुछ होता है' सारखे सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया खास गोष्टी 

विभागणी झाल्यावर यश जोहर आपल्या कुटुंबासोबत दिल्लीला आहे. दिल्लीत आल्यावर त्यांनी 'नानकिंग स्वीट्स' चं दुकान सुरू केलं. यश हे आपल्या 9 भावंडांपेक्षा जास्त शिकलेले होते. यामुळे वडिलांनी त्यांना दुकानावर बसवलं. ज्यामुळे ते दुकानाही हिशोब सांभाळत असे. पण यश जोहर यांना हे काम अजिबात आवडत नसे. मात्र यश जोहर यांच्या आईने त्यांची साथ दिली आणि सांगितलं, तु मंबईला जा मिठाईचं दुकान सांभाळण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही. आईने यश यांना मुंबईत पाठवण्यासाठी घरातून दागिने आणि पैसे गायब केले. आणि यश यांना मुंबईत पाठवलं. या प्रकरणी त्यांच्या घरातील शिपायावर आरोप आला आणि त्याला बेदम मारण्यात देखील आलं. 

यश मुंबईला तर आले पण सुरूवातीच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला. यश टाइम्स ऑफ इंडियामध्ये फोटोग्राफर बनण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या दिवसांत दिग्दर्शक के आसिफ 'मुगल - ए - आजम' या सिनेमाचं शुटिंग करत होते. त्या दिवसांत त्यांनी मधुबालाचा फोटो काढला होता. मधुबालाबद्दल असं म्हटलं जातं की, ती कुणाला आपला फोटो काढू देत नव्हती. त्याकाळात यश जोहर खूप चांगल इंग्रजी बोलत असतं  ज्यामुळे इम्प्रेस होऊन मधुबालाने त्यांना फोटो काढण्याची परवानगी दिली होती. 

मधुबाला यश जोहर यांनी काढलेल्या फोटोमुळे इतकी इम्प्रेस झाली की, ती त्यांना गार्डन फिरायला घेऊन गेली. मग काय यश ज्यावेळी फोटो काढून ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांना नोकरी मिळाली. यश जोहर पूजा आणि देवावर खूप विश्वास ठेवत असे. त्यांना देवाची आवड होती आणि ही आवड अनेकदा त्यांच्या सिनेमातून दिसते. 

Read More