Marathi News> मनोरंजन
Advertisement

कियारा अडवाणीचा 34 वा वाढदिवस, यशराज फिल्म्सकडून चाहत्यांना खास सरप्राईज, दिली खास भेट

Kiara Advani Birthday Special: यशराज फिल्म्सने कियारा अडवाणीच्या 34 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांसाठी एक खास निर्णय घेतला आहे. काय आहे तो निर्णय? जाणून घ्या सविस्तर 

कियारा अडवाणीचा 34 वा वाढदिवस, यशराज फिल्म्सकडून चाहत्यांना खास सरप्राईज, दिली खास भेट

Kiara Advani Birthday:  यशराज फिल्म्सने कियारा अडवाणी आणि तिच्या चाहत्यांना एक खास भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. आज ती तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या आगामी अ‍ॅक्शन चित्रपट 'वॉर 2' मधील पहिले गाणे 'आवन जावन', जे एक रोमँटिक आणि डान्स करायला लावणारे गाणं आहे. आज ते कियाराच्या वाढदिवशी रिलीज होणार आहे.

ऋतिक रोशन आणि तेलगू सुपरस्टार ज्युनियर एनटीआर हे दोघे प्रथमच या बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपट 'वॉर 2' मध्ये झळकणार आहेत. हा चित्रपट 14 ऑगस्ट 205 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे.

आवन जावनची पहिली झलक

‘वॉर 2’ चा ट्रेलर जसा अ‍ॅक्शन आणि अ‍ॅडव्हेंचरने भरलेला आहे, तसाच आता या चित्रपटाच्या पहिल्या गाण्याची झलक एकदम वेगळी, हृदयस्पर्शी आणि रोमँटिक आहे. अयान मुखर्जी यांनी ऋतिक रोशन आणि कियारा अडवाणीचा एक सुंदर फोटो देखील शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, आवन जावन हे 'वॉर 2' मधील आमचं पहिलं गाणं आज प्रदर्शित होणार आहे. प्रीतम, अमिताभ, अरिजीत, ऋतिक आणि कियारा हे सगळे एकत्र पहिल्यांदाच स्क्रीनवर दिसणार आहेत. त्यांची ऊर्जा आणि रोमँटिक वाइब्स प्रेक्षकांना नक्कीच भावतील असं त्यांनी म्हटलं. 

चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता

हे गाणं इटलीमध्ये शूट करण्यात आलं असून, अयानच्या मते हा चित्रपट बनवतानाचा सर्वात सुंदर अनुभव होता. ‘वॉर 2’ हा यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्सचा एक महत्त्वाचा भाग आहे. ऋतिक रोशनचा ‘कबीर’ हे पात्र पुन्हा एकदा परतणार आहे आणि त्याला टक्कर देण्यासाठी एनटीआरच्या ‘सामर्थ्यशाली’ भूमिकेची चर्चा सध्या जोरात आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या चित्रपटात कियारा आडवाणीची देखील प्रमुख भूमिका असून ती या थरारक सीक्वेलला एक नवीन दिशा देणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. ‘वॉर 2’ मधील अ‍ॅक्शन पोस्टर्स, स्टारकास्ट, संगीत आणि रोमँटिक गाण्यांमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘आवन जावन’ हे गाणं प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीन वाढणार यात शंका नाही.

Read More