Yasser Desai : वांद्रे पोलिसांनी काली रात्री मंगळवारी गायक सिंगर-सॉन्ग राइटर यासेल देसाई विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासेरनं कथितपणे त्याच्या जीव धोक्यात टाकण्याच्या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. त्यानं मुंबईमध्ये वांद्रे-वरळी सी लिंक (BWSL) च्या कट्ट्यावर उभ राहत त्यानं हा स्टंट केला होता. पोलिसांनी सध्या यावरून यासेर आणि स्टंट करणाऱ्या यासेरसोबत इतर दोन लोकांचा शोध घेत आहे. पण अजून त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
हा स्टंट इतका धोकादायक होता की त्यामुळे त्याचेच नाही तर इतर लोकांचे प्राणही धोक्यात आले असते. पोलीस सध्या यासेर आणि त्याच्या दोन साथीदारांचा शोध घेत आहेत. मात्र, अजून त्यांना अटक झालेली नाही. याविषय सांगताना पोलिसांनी माहिती दिली की सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर त्यांनी लगेच सी लिंकवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दिसले की एक व्यक्ती आपल्या गाडीनं सी लिंकवर आला, गाडी थांबवली आणि थेट पुलाच्या कट्ट्यावर जाऊन उभा राहिला. त्याचे दोन मित्र त्या वेळी त्याचा स्टंट शूट करत होते. स्टंट झाल्यावर तिघेही तिथून गाडीतून निघून गेले.
Shocking visuals from #Bandra #Worli Sea Link!
— Furkan Shaikh (@Furkanrshaikh) July 8, 2025
The man seen trying to jump appears to be singer #YasserDesai.
If it's a mental health crisis, I hope he's safe & gets help.
But if it's a stunt, it endangered lives & public order.@CPMumbaiPolice - @MumbaiPolice must take action. pic.twitter.com/N70K8BVu1H
सीसीटीव्ही फुटेजमधून हे स्पष्ट झालं की, हे तिघं मंगळवारी सकाळी 6 वाजता तिथे पोहोचले आणि स्टंट केला. पोलिसांनी या स्टंटमागचं खरं कारण शोधायला सुरुवात केली आहे. त्यांना संशय आहे की, कदाचित हे एखाद्या म्युझिक व्हिडीओचं शूटिंग असू शकतं.
हा स्टंट त्या वेळी तिथून जाणाऱ्या काही लोकांनी व्हिडीओमध्ये शूट केला आणि सोशल मीडियावर टाकला. तो व्हिडीओ पाहून मुंबई पोलिसांनाही कळलं. आता पोलीस हेही तपासत आहेत की, हा केवळ स्टंट होता की सुसाइड करण्याचा प्रयत्न होता.
भारतीय दंड संहिता अंतर्गत खालील कलमांनुसार यासेर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 285 – सार्वजनिक मार्गावर किंवा वाहतुकीत अडथळा निर्माण करणे किंवा धोका निर्माण करणे. कलम 281 – सार्वजनिक मार्गावर निष्काळजीपणे वाहन चालवणे. कलम 125 – इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणारे कृत्य करणं. कलम 3(5) – एकाच उद्देशाने अनेक व्यक्तींनी एकत्रितपणे केलेला गुन्हा. मोटार वाहन कायदा कलम 184 – धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे