Marathi News> मनोरंजन
Advertisement

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम कपलनं झालं विभक्त; पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, 'मी त्याची...'

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Couple : 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्रीनं नवऱ्यासोबत विभक्त होण्याची केली घोषणा... 

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम कपलनं झालं विभक्त; पोस्ट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, 'मी त्याची...'

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Couple : छोट्या पडद्यावरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केलं. या मालिकेतील कलाकार लता सभरवालनं अभिनेता आणि नवरा संजीव सेठपासून विभक्त होणार असल्याची घोषणा केली आहे. लता सभरवालनं केलेल्या या घोषणेनंतर सगळ्यांना मोठी धक्का बसला आहे. तिनं सांगितलं की संजीवपासून विभक्त झाली आहे. त्याशिवाय तिनं हे देखील सांगितलं की ती आभारी आहे की संजीवमुळे तिच्या आयुष्यात तिचा मुलगा आला.

काय म्हणाली लता सभरवाल

लतानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली. लता म्हणाली, 'बराच काळ शांत राहिल्यानंतर मी लता हे सांगू इच्छिते की मी माझा नवरा संजीव सेठपासून विभक्त झाली आहे. मी त्याची आभारी आहे की त्यांनी मला इतका सुंदर मुलगा दिला. मी त्याला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते.' 

लता आणि संजीव यांची पहिली भेट

लता आणि संजीव या दोघांनी 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. मालिकेत देखील त्या दोघांनी नवरा-बायकोची भूमिका साकारली होती. त्या दोघांनी अक्षराच्या आई-वडिलांची भूमिका साकारली होती. रिपोर्ट्सनुसार, दोघांची या शो दरम्यानच भेट झाली आणि काही काळानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. त्यानंतर 2010 मध्ये त्या दोघांनी सप्तपदी घेतल्या. तर 2013 मध्ये दोघं आई-वडील झाले. तर लता आणि संजीव हे दोघे झलक दिखलाजा या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. 

हेही वाचा : के-पॉप स्टारचा 'चिकनी चमेली' गाण्यावर डान्स; कतरिना कैफ सारखा Dance पाहून नेटकरी आवाक

मालिका ते चित्रपट लताचं करिअर... 

दरम्यान, लतानं 2021 मध्ये छोट्या पडद्याला रामराम केला. 'आरजू है तू', 'आवाज दिल से दिल तर', 'जन्नत', 'वो रहने वाली महलों की', 'मैं तेरी परछाई हूं', 'इश्क में मरजावां शो'ज केल्यानंतर लतानं टिव्ही इंडस्ट्री सोडली. लताच्या चित्रपटांविषयी करिअर विषयी बोलायचं झालं तर विवाह आणि इश्क-विश्कमध्ये काम केलं आहे. सध्या लता सोशल मीडिया इन्ल्फुएन्सर झाली आहे. तर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे व्हिडीओ शेअर करते. हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. 

Read More