Marathi News> मनोरंजन
Advertisement

Yo Yo Honey Singh's Tattoo: हनी सिंगने एकाचवेळी काढले 3 टॅटू; दुसरा टॅटू खूपचं खास

प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंगने पहिल्यांदाच आपल्या शरीरावर टॅटू काढण्याचा निर्णय घेतला, तोही थेट तीन टॅटूंचा एकत्र अनुभव घेत. त्यांच्या चाहत्यांनी त्याचा टॅटूचे खूप कौतुक केले आहे. पाहूयात त्याने टॅटूंमध्ये काय-काय काढले?   

Yo Yo Honey Singh's Tattoo: हनी सिंगने एकाचवेळी काढले 3 टॅटू; दुसरा टॅटू खूपचं खास

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगने नुकतेचं नवीन 3 टॅटू काढले आहे. इतक्या वर्षांत त्याने एकही टॅटू काढले नव्हते. त्याने हे तीन टॅटू त्याचा सगळ्यात जवळच्या लोकांसाठी काढले आहे. पाहूयात नेमकं काय असे या टॅटूमध्ये.

आईसाठी काढला खास टॅटू: हनी सिंगचा पहिला टॅटू म्हणजे त्याची आई भूपिंदर कौर यांच्या हस्ताक्षरीचा टॅटू. या टॅटूमध्ये गर्भात वाढणाऱ्या बाळाचे हृदयस्पर्शी चित्र देखील आहे. आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत हनीने लिहिले, 'माझा पहिला टॅटू! माझ्या आईची सही. पृथ्वीवरची सर्वात श्रीमंत स्त्री. आई, मी तुला खूप प्रेम करतो.' त्याच्या या शब्दांनी अनेक चाहत्यांना भावूक केलं.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ए.आर. रहमान यांना दिला मान
हनी सिंगचा तिसरा टॅटू सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांना समर्पित आहे. आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिले, 'माझ्या लाडक्या दिग्गज ए.आर. रहमान सरांसाठी माझा तिसरा टॅटू! माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे सर, सर्व गोष्टींसाठी धन्यवाद.'
हनी सिंगने रहमान यांच्यासाठी नेहमीच आदर व्यक्त केला असून, त्याने त्याच्या संगीत प्रवासात रहमान यांच्याकडून प्रेरणा घेतल्याचे पूर्वीही सांगितले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दुसरा टॅटू अद्याप गुप्त
हनी सिंगचा दुसरा टॅटू मात्र अद्याप गुप्तच आहे. तो कोणासाठी आणि कोणत्या अर्थाने बनवला आहे, हे त्याने उघड केलं नाही. त्याने लिहिलं, 'मी माझा दुसरा टॅटू पोस्ट करणार नाही, कारण तो खूप वैयक्तिक आहे.' यामुळे चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे.

चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया
त्याच्या या सोशल मीडियाच्या पोस्टवर चाहत्यांकडून जबरदस्त प्रेम व्यक्त केलं जात आहे. राघव जुयालने हार्ट इमोजी पोस्ट केली, तर काही नेटकरी म्हणाले, 'हनी सिंगचं ए.आर. रहमान यांच्यावर असलेलं प्रेम पाहून छान वाटलं.' काहींनी तर रहमान यांना टॅग करत लिहिलं,
'प्लीज सर, हनी सिंगसोबत एखादं गाणं करा!'

 हे ही वाचा: 'कामचुकारपणा, निर्लज्जपणाचा कळस'; लोकप्रतिनिधींना निशाण्यावर घेत सुमीत राघवननं ओढले ताशेरे

हनी सिंगच्या कमबॅकने चर्चेला उधाण

सध्या हनी सिंग आपले नवीन अल्बम्स, लाईव्ह परफॉर्मन्सेस आणि विविध प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे. त्याने मध्यंतरी काही काळासाठी संगीत क्षेत्रातून ब्रेक घेतला होता, मात्र आता तो जोमाने परतला आहे. हे नवीन टॅटू म्हणजे त्याच्या जीवनातील नव्या पर्वाची सुरूवात असल्याचं त्याच्या पोस्टवरून दिसून येतं. 

हनी सिंग बायपोलर डिसऑर्डरशी झुंजत होता. ज्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आणि त्याला सार्वजनिक जीवनापासून दूर जावे लागले. या आजारामुळे त्याने सांगितले की, 'त्याचा मेंदूने जास्त काम केले तर तो नियंत्रणाबाहेर जाईल. त्याने या आजारार उपचार घेतले आणि त्याच्या जीवनशैलीत बदल केले, ज्यामध्ये दारू सोडणे आणि त्याच्या आहारावर आणि व्यायामाच्या दिनचर्येवर लक्ष केंद्रित करणे समाविष्ट होते. 

Read More