Marathi News> मनोरंजन
Advertisement

'तू मुस्लिमच आहेस ना?', नेटकऱ्याचा सलमानला सवाल

वेगवेगळ्या पद्धतीत नमस्कार केल्यामुळे नेटकऱ्यांनी 'तू मुस्लिमच आहेस ना?', असा प्रश्न विचारला आहे. 

'तू मुस्लिमच आहेस ना?', नेटकऱ्याचा सलमानला सवाल

मुंबई : आजच्या अधुनिक जगातही काही लोक धर्म, जात, वंश इत्यादींच्या पेचात अडकलेले आहेत. याचच अनुभव बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून आला आहे. सध्या 'बॉटल कॅप चॅलेंज'च्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. हेच चॅलेंज स्वीकारत सलमानने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. परंतु त्याच्या चॅलेंजला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Don’t thakao paani bachao

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

कोणतेही लहान मोठे आव्हान स्वीकारण्यासाठी प्रत्येक जण सर्वात आधी देवाला नमन करतात. या व्हिडिओमध्येही सलमान असंच काही करताना दिसत असून हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन पद्धतीत नमस्कार करताना दिसतो. याच कृतीमुळे त्याला चाहत्यांच्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. 

वेगवेगळ्या पद्धतीत नमस्कार केल्यामुळे नेटकऱ्यांनी 'तू मुस्लिमच आहेस ना?', असा प्रश्न विचारला आहे. तर, कोणी त्याची खिल्लीही उडवली. 'बॉटल कॅप चॅलेंज'चा हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये सलमानने पाणी जपूण वापरण्याचा संदेशही दिला आहे. पण, त्याचा हा संदेश ऐकण्या आणि वाचण्याला प्राधान्य न देता नेटकऱ्यांनी मात्र धर्माचं कारण पुढे करत सलमानला धारेवर धरलं. 

'भारत' चित्रपटाच्या दमदार कामगिरीनंतर सलमान 'दबंग ३' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि सलमान यांची चुलबूल-रज्जोची जोडी चाहत्यांना पुन्हा अनुभवता येणार आहे. 'दबंग ३' २० डिसेंबर मध्ये चित्रपटगृहात दाखल होणार आहे.  

Read More