Marathi News> मनोरंजन
Advertisement

Met Gala 2019 : ....अन् रेड कार्पेटवर बहिणीनं दीपिकाला गाठलंच

तिने दीपिकाची भेट घेण्यासाठी फार प्रयत्नही केल्याचं म्हटलं 

Met Gala 2019 : ....अन् रेड कार्पेटवर बहिणीनं दीपिकाला गाठलंच

मुंबई : मेट गाला २०१९ हा विषय सोशल मीडियावर सध्या बराच ट्रेंडमध्ये आहे. कलाविश्वात तर सध्या याच सोहळ्याची चर्चा सुरू आहे. चौकटीबाहेरचे लूक, अफलातून स्टाईल स्टेटमेंट आणि त्यातही भन्नाट कल्पवाशक्तीची उदाहरणं यंदाच्या मेट गाला २०१९ मध्ये पाहायला मिळाली. यामध्ये भारतीय कलाकारांचीही उपस्थिती पाहायला मिळाली. 

मेट गालाच्या रेड कार्पेटवर एकिकडे अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या लूकची खिल्ली उडवली जात असतानाच दीपिकाच्या लूकची मात्र बरीच प्रशंसा झाली. अशा या झगमगत्या सोहळ्यात दीपिकाची भेट एका खास व्यक्तीशीही झाली. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून दीपिकाची बहिण आहे बरं. 

दीपिकाची बहिण..... असं म्हटल्यावर तुमच्या डोळ्यांसमोर लगेचच अनिशा पदुकोणचा चेहरा आला असेल. पण, कान्सच्या रेड कार्पेटवर दीपिकाला भेटलेली तिची ही बहिण अनिशा नसून, आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेलं एक प्रचंड लोकप्रिय नाव आहे. ते नाव म्हणजे युट्यूबर आणि 'सुपरवूमन' म्हणून ओळख असणाऱ्या लिली सिंग हिचं. 

खुद्द लिलीनेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दीपिकासोबतचा फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये तिने दीपिकाची भेट घेण्यासाठी कशा प्रकारे मेहनत घेतली याचंही वर्ण केलं. 'संपूर्ण मेट गालामध्ये तिचा शोध घेतल्यानंतर, ६ खुर्च्या माझ्या या ड्रेसने उडवत अखेर या माझ्या बहिणीची भेट घडली आणि तिला मिठी मारली', असं लिलीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं. मोठ्या उत्साहात लिलीने लिहिलेल्या या पोस्टला दीपिकानेही तिच्या अंदाजात उत्तर दिलं. 

लिलीच्या या पोस्टला दीपिकाने लिहित तिला भेटण्याचा एक सोपा मार्ग सांगितला. 'पुढच्या वेळी मला फक्त एक फोन करत जा.... भेटण्याचा सर्वात सोपा मार्ग....', असं लिहित दीपिकानेही तिच्या आ मेट गालामध्ये भेटलेल्या सेलिब्रिटी बहिणीप्रती प्रेम व्यक्त केलं. त्यामुळे लिली आणि दीपिकाचा हा अंदाज मेट....मधील चर्चांमध्ये तितकाच खास ठरत आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

Read More