Marathi News> मनोरंजन
Advertisement

Arjun Kapoor च्या बहिणीचं बोल्ड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आश्चर्यचकित

अर्जुनची बहिण अंशुला कपूर देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कारण...  

Arjun Kapoor च्या बहिणीचं बोल्ड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आश्चर्यचकित

मुंबई : अभिनेता अर्जुन कपूरसोबतचं त्याच्या अनेक बहिणी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. आता अर्जुनची बहिण अंशुला कपूर देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचा अंदाज तिचा फोटो पाहून वर्तवण्यात येत आहे. फोटोमध्ये अंशुलाचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे. तिचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री देखील फिक्या पडतील...

अंशुलाने एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये, 'मेकअप काढून टाका... केस मोकळे सोडा, दिर्घ श्वास घेत आरश्यात स्वतःला पाहा आणि म्हणा.. 'आय लाईक यू...'' असं लिहिलं आहे. अंशुलाची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

अंशुला अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

पण नुकताचं पोस्ट केलेल्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. एका युझरने कमेंटमध्ये लिहिलं, 'काय बॉडी ट्रान्सफॉर्मेशन आहे.. आता फक्त रुपेरी पडद्यावर पाहाण्याची प्रतीक्षा....'

Read More