Marathi News> मनोरंजन
Advertisement

Mahakumbh 2025: 'इतकं घाणेरडं...'. कतरिनाचा स्नान करतानाचा VIDEO काढणाऱ्या तरुणांवर रवीन टंडन संतापली, Insta वर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ महाकुंभमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचली असता, तिच्याभोवती झालेली गर्दी पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला.   

Mahakumbh 2025: 'इतकं घाणेरडं...'. कतरिनाचा स्नान करतानाचा VIDEO काढणाऱ्या तरुणांवर रवीन टंडन संतापली, Insta वर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन महाकुंभमध्ये सामील होण्यासाठी प्रयागराज येथे पोहोचली असता तिची भेट कतरिना कैफशी झाली होती. त्यांनी व्हीआयपींसाठी राखीव असलेल्या त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नानही केलं. पण काही वेळातच कतरिना कैफभोवती लोकांनी गर्दी केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गर्दी करणारे कतरिना कैफचे व्हिडीओ, सेल्फी काढत होते. तसंच तिची एखादी प्रतिक्रिया मिळावी यासाठी प्रयत्न करत होते. यादरम्यान आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही तरुण कतरिना कैफचा व्हिडीओ काढून ती स्नान करत असताना खिल्ली उडवताना दिसत आहेत. 

व्हिडीओवर चाहत्यांची नाराजी

व्हिडीओमध्ये दोन तरुण स्नान करताना आधी कॅमेरा स्वत:भोवती ठेवतात आणि नंतर कतरिना कैफच्या दिशेने वळवताना दिसतात. "हा मी आहे, हा माझा भाऊ आहे आणि ही कतरिना कैफ," असं तरुण बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. यादरम्यान त्याच्या आजुबाजूला असणारे जोरजोरात हसताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटककऱ्यांनी नाराजी जाहीर केली आहे. अनेकांनी अभिनेत्रीचा छळ केला जात असल्याचं म्हटलं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mamaraazzi (@mamaraazzi)

संताप व्यक्त करणाऱ्यांमध्ये अभिनेत्री रवीना टंडनदेखील आहे. "हा घाणेरडा प्रकार आहे. जो क्षण अर्थपूर्ण आणि शांतीपूर्ण असणं अपेक्षित होतं, तो अशा लोकांमुळे खराब होतो," असं रवीना टंडन म्हणाली आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलं आहे की, "हे फार वाईट आहे, सामूहिकपणे त्रास दिला जात आहे". हे धक्कादायक असून, लोक इतके बेशरम कसे असू शकतात? अशी विचारणा एकाने केली आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटलं आहे की, हे फार वाईट आणि त्रासदायक आहे. 

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला, सोशल मीडियावर ड्रोनवर शूट केलेला आणखी एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात कतरिना तिच्या सासूसोबत नदीत डुबकी मारत असताना तिच्याभोवती मोठी गर्दी दिसत होती.

महाकुंभ मेळा 13 जानेवारी रोजी सुरू झाला आणि 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त संपला. महाकुंभमेळ्यात कतरिनाचा पती विकी कौशल, सोनाली बेंद्रे, अक्षय कुमार, जुही चावला आणि गुरु रंधावा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

Read More