मुंबई : प्रसिद्ध YouTuber आणि कॉमेडियन भुवन बाम याने यशस्वीरीत्या OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. भुवन बामने सोशल मीडियावर स्क्रिप्टसोबतचा आपला फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच या सिनेमाचा टीझरही शेअर केला आहे. या त्याच्या सिरिजची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
भुवन बाम हा तरुणांमध्ये प्रसिद्ध YouTuber आणि विनोदी अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. तो एक चांगला गायकही आहे. त्याच्या कॉमिक यूट्यूब चॅनेल 'बीबी की वाइन्स'साठी ओळखला जातो. यूट्यूबवर प्रचंड लोकप्रियतेनंतर आता भुवनने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही पाऊल ठेवले आहे.
'ताजा खबर' या शीर्षकाखाली बनत असलेल्या या मालिकेचे शूटिंगही भुवनने सुरू केले आहे. या मालिकेचा चित्रपटाचा टीझर शेअर करून भुवनने पुन्हा एकदा त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना माहिती दिली.
With good karma on one’s side, can one man set out to become a master of his own destiny?
— Bhuvan Bam (@Bhuvan_Bam) June 10, 2022
Meet Vasya from my OTT debut -#HotstarSpecials #TaazaKhabar only on @ @DisneyPlusHS#TaazaKhabarOnHotstar@shriyap @pprathameshparab @deven_bhojani & #NityaThakur. pic.twitter.com/A2rxfQjTr7
टीझरमध्ये काय?
टीझरमध्ये आई आणि मुलगा यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे. यासोबतच भुवनशी संबंधित सर्व कलाकारांचीही ओळख करून देण्यात आली आहे. या मालिकेत श्रिया पिळगावकर, प्रथमेश परब आणि देवेन भोजानी यांसारखे कलाकार देखील आहेत. भुवनने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'चांगले कर्म बाजूला ठेवून, माणूस स्वत:च्या नशिबाचा स्वामी बनण्यास तयार होऊ शकतो का? या सीरिजची भूवनच्या चाहत्यांना उत्सुकता लागलीय.