Marathi News> मनोरंजन
Advertisement

यूट्यूबर पुनीत कौरचे राज कुंद्रावर गंभीर आरोप, म्हणाली तो जेलमध्येच...

राज कुंद्रावर आणखी एका मॉडेलने गंभीर आरोप केले आहे,

यूट्यूबर पुनीत कौरचे राज कुंद्रावर गंभीर आरोप, म्हणाली तो जेलमध्येच...

मुंबई : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अडचणीत आला आहे. राज कुंद्राबद्दल प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यांच्यावर अश्लील फिल्म बनवल्याचा आणि आपल्या अॅपवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. मुंबई गुन्हे शाखेने सोमवारी रात्री अश्लील चित्रपट बनवल्या प्रकरणी राज कुंद्राला अटक केली. त्यानंतर राज कुंद्राला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता तेथे त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

एका प्रसिद्ध यू ट्यूबरने आता दावा केला आहे की, राज कुंद्राने तिला 'हॉटशॉट्स' या अ‍ॅपच्या व्हिडिओमध्ये काम करण्यास सांगितले होते.

राज कुंद्राने तिला आपल्या अ‍ॅपच्या व्हिडिओंमध्ये काम करण्यास सांगितले असल्याचे प्रसिद्ध युट्यूबर पुनीत कौरने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीद्वारे उघड केले आहे. पुनीत कौरने इंस्टा स्टोरीवर बरेच फोटो शेअर केले आहेत.

पुनीत कौरने म्हटलं की, राज कुंद्राचा मॅसेज पहिल्यांदा माझ्याकडे आला तेव्हा मला वाटलं की हा स्पॅम आहे. राज कुंद्राला जेलमध्ये पाठवलं पाहिजे असं तिने म्हटलं आहे.

मॉडेल सागरिका शोनाटे आरोप

पुनीत कौरपूर्वी इतर अनेक लोकांनी राज कुंद्रावर गंभीर आरोप केले आहेत. पूनम पांडे आणि सागरिका शोना सुमन यांनी राज कुंद्रावर आरोप केले होते. व्हिडिओ कॉलद्वारे व्हर्च्युअल ऑडिशन देण्यास सांगण्यात आल्याचे सागरिका शोना यांनी सांगितले होते. तिच्या मते, व्हिडिओ कॉलमध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तीने तिला नग्न होऊन ऑडिशन देण्यास सांगितले होते. पण या मागणीनंतर मॉडेल सागरिका शोनाने ऑडिशन देण्यास नकार दिला.

11 जणांना अटक

अश्लील व्हिडिओ संदर्भात मुंबई पोलीस राज कुंद्राची चौकशी करत आहेत. राज यांच्यासह इतरांनाही अश्लील चित्रपट बनवून आणि अ‍ॅपवर प्रसारित केल्याबद्दल या प्रकरणात आतापर्यंत 11 लोकांना अटक करण्यात आली आहे.

Read More