Marathi News> मनोरंजन
Advertisement

...म्हणून 'दंगल गर्ल' झायराची चाहत्यांना विनंती

'माझ्या आयुष्याचा नवा चॅप्टर सुरू करत आहे...'
 

...म्हणून 'दंगल गर्ल' झायराची चाहत्यांना विनंती

मुंबई  : 'द स्काय इंज पिंक' चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर 'दंगल गर्ल' फेम झायरा वसीमने कलाविश्वासोबत असलेलं नातं तोडलं आहे. गेल्या वर्षी धर्माचं कारण देत तिने चित्रपट विश्वाला रामराम ठोकला होता. त्यामुळे तिचं चित्रपटसृष्टी सोडणं एक वादाचा मुद्द बनला होता. दरम्यान आता पुन्हा तिने चाहत्यांकडे एक मागणी केली आहे. सोशल मीडियावरील माझ्या  फोटोंचा वापर आता करू नका ते डीलीट करा अशी विनंती तिने चाहत्यांकडे केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने यासंबंधी एक पोस्ट शेअर केली आहे. शिवाय खास कारण देखील तिने सांगितले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zaira Wasim (@zairawasim_)

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती म्हणते की, 'आतापर्यंतच्या प्रवासात तुमची मिळालेली साथ कधीही विसरणार नाही, माझ्या आयुष्याचा नवा चॅप्टर सुरू करत आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमाचा आणि मदतीचा मला फार उपयोग होत आहे. त्यासाठी मी तुमची आभारी आहे.' असं ती म्हणाली.

आभारी असल्याचं सांगत तिने चाहत्यांकडे एक विनंती केली आहे. सोशल मीडियावरील माझे फोटो डीलीट करा आणि इतर फॅन पेजला देखील डीलीट करण्यास सांगा. सोशल मीडियावरून माझे सर्व फोटो हटविणे शक्य नाही. त्यामुळे मी ही विनंती करत असल्याचं तिने सांगितले आहे. 

Read More