Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानसोबत काम करून माझ स्वप्न पूर्ण झालं - झरीन खान

सलमानसोबत 'वीर' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खानने त्याचे आभार मानले आहेत.

सलमानसोबत काम करून माझ स्वप्न पूर्ण झालं - झरीन खान

नवी दिल्ली :    सलमान सोबत 'वीर' मध्ये काम करणे माझ्यासाठी स्वप्नातील सुरूवात होती असे अभिनेत्री झरीन खानने म्हटले आहे.

सलमानसोबत 'वीर' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री झरीन खानने त्याचे आभार मानले आहेत.

माझी इच्छा नव्हती 

'सलमान माझ्यासाठी नेहमी खास, प्रिय आणि जवळचा आहे. मी त्याच्यासाठी काम केले नसते तर या इंडस्ट्रीचा हिस्सा कधीच बनले नसते.

कारण या क्षेत्रात येऊन सिनेमात काम करावे ही माझी इच्छा नव्हती' असेही ती म्हणाली.

आगामी सिनेमा 

झरीनने सलमानसोबत 'रेड्डी' मध्येही काम केले. ती आता '१९२१' आणि 'वन डे' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

Read More