Marathi News> मनोरंजन
Advertisement

सलमानसोबतचं नातंही अभिनेत्रीसाठी Unlucky; पैशांसाठी स्वीकारला असा मार्ग

सलमानची साथ मिळूनही अभिनेत्रीच्या वाट्याला अपयश, बॉलिवूमध्ये बोल्ड भूमिका साकारल्यानंतर ती करतेय हे काम  

सलमानसोबतचं नातंही अभिनेत्रीसाठी Unlucky; पैशांसाठी स्वीकारला असा मार्ग

मुंबई : अभिनेता सलमान खानने आजपर्यंत अनेक उभारत्या कलाकारांना बॉलिवूडचा मार्ग मोकळा करुन दिला. सलमानने ज्या नव्या कलाकारांना संधी दिल्या, त्यांपैकी काही सेलिब्रिटी आज यशाच्या उच्च शिखरावर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काहींच्या वाट्याला मात्र अपयश आलं आहे. सलमानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, पण वाट्याल्या न आलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे झरिन खान. अभिनेत्री झरिन खान 'वीर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सिनेमाच्या सर्व गाण्यांना चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. 

पण 'वीर' सिनेमानंतर झरिनच्या पदरी कायम अपयश पडलं. सिनेमात साधी-सरळ दिसणारी झरीनने 'वीर'नंतर अनेक बोल्ड भूमिका साकारल्या, ज्यामुळे ती तुफान चर्चेत आली. झरीन आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असेत. सोशल मीडियावर झरीन स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो पोस्ट करत असते.

fallbacks

आता सोशल मीडियावर सक्रिय असणारी झरीन 'वीर' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली, पण 'हेट स्टोरी 3'  सिनेमात अनेक बोल्ड सीन दिले आहे. त्या बोल्ड सीनमुळे झरीन आजही तुफान चर्चेत आहे.     

'हेट स्टोरी 3' सिनेमा 2015 साली रिलीज झाला होता.  ज्यामध्ये झरीन खानने अभिनेता करण सिंग ग्रोव्हर आणि अभिनेता शरमन जोशीसोबत स्क्रीन शेअर केली होती.  

सिनेमात करण आणि शरमनसोबत तिने बोल्ड सीन दिले.  फक्त शरमन जोशीसोबतचं नाही तर करणसोबत देखील तिचे बोल्ड सिन आहेत. बॉलिवूडमध्ये अयशस्वी ठरल्यानंतर झरीन आता पंजाबी आणि तेलुगू सिनेमांमध्ये नशीब आजमावत आहे. 

Read More