Marathi News> मनोरंजन
Advertisement

'कमळी' मालिकेचा दमदार प्रोमो चर्चेत; विजया बाबरने सांगितला शिवस्तुती पाठांतराचा अनुभव

Zee Marathi TV Serial News: 'कमळी' ही मालिका झी मराठी वर लवकरच पाहायाला मिळणार आहे. या मालिकेत तुम्हाला गावाकडील मुलगी शहराच्या कॉलेजमध्ये आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी पोहोचते तेव्हा तिच्यासमोर कोणत्या नव्या अडचणी उभ्या राहाणार आहेत हे पाहूयात.   

'कमळी' मालिकेचा दमदार प्रोमो चर्चेत; विजया बाबरने सांगितला शिवस्तुती पाठांतराचा अनुभव

Zee Marathi New TV Show Kamali: झी मराठीवरील प्रेक्षकांसाठी एक नव्या दमाची मालिका 'कमळी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित ही मालिका एका बंडखोर आणि जिद्दी मुलीची कहाणी सांगणार आहे, जी अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि गावात आपली वेगळी ओळख निर्माण करते.

या मालिकेतील टायटल प्रोमो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेत्री विजया बाबर एक दमदार आणि उर्जेने भरलेली शिवस्तुती सादर करताना दिसते, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की कमळीला शहरात जाऊन शिक्षण घ्यायचे असते. मात्र, तिची आई तिला मुंबईला येण्यास नकार देते. कालांतराने कमळी मुंबईतील एका कॉलेजमध्ये प्रवेश घेते. तिथे शहरी जीवन पाहून ती सुरुवातीला गोंधळून जाते. कमळी तिचा वर्ग शोधत असताना ती चुकून एका मुलीला धडकते. कमळी तिला विचारते की तिचा FYचा वर्ग कुठे आहे. ती मुलगी रागाने म्हणते, 'थांब, तुला तुझा क्लास दाखवते' आणि संपूर्ण कॉलेजसमोर नाच आणि रॅप करून दाखवते. त्यानंतर सगळे कमळीला म्हणतात, 'तू काय करणार आहेस?' 'तू तर गावाकडची मुलगी आहेस.' यावर उत्तर देताना, कमळी सर्व विद्यार्थ्यांसमोर उर्जेने भरलेली शिवस्तुती सादर करते. हे पाहून कॉलेजमधील सगळे विद्यार्थी चकित होतात आणि जोरदार टाळ्या वाजवू लागतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

विजया बाबरने हा प्रोमो करताना घेतलेला अनुभव शेअर केला. ती म्हणाली, 'जेव्हा मी ढोल-ताशा पथक पाहायचे तेव्हा त्यांच्या तोंडून येणारी शिवस्तुती ऐकून मला नेहमीच वाटायचं की आपल्यालाही ती शिकावी. 'कमळी'मुळे मला ती संधी मिळाली. यासाठी मला 2 दिवस लागले, कारण योग्य उच्चार, टायमिंग आणि ऊर्जा टिकवून ठेवणं हे खूपच कठीण होतं.' ती पुढे म्हणते, 'मी सतत शिवस्तुती ऐकत होते आणि मनाशी रिहर्स करत होते. माझ्यासाठी हे एक खूप मोठं आव्हान होतं. विशेषतः, आमचा शूट संध्याकाळी सूर्यास्तापूर्वीच संपवायचा होता, त्यामुळे वेळेचंही दडपण होतं. पण अखेर तो सीन इतका चांगला झाला की सेटवर सर्वांना तो खूप आवडला.'

हे ही वाचा: आशु- शिवाची नवीन लढाई; नाईट स्कुल, घर आणि नाती सांभाळण्याची कसोटी

'कमळी' ही मालिका ग्रामीण जीवन, परंपरा आणि महिला सबलीकरण या विषयांभोवती फिरणारी आहे. विजया बाबर ही मालिकेतील मुख्य भूमिका साकारत असून तिच्या सशक्त अभिनयाची झलक या प्रोमोतच दिसून येते. 'कमळी' लवकरच येत आहे तुमच्या भेटीला, फक्त झी मराठीवर.

Read More