Marathi News> मनोरंजन
Advertisement

आजारपणातही अभिनेत्रीच शूटिंग,तब्येत अजून खालावली

 तिची तब्ब्येत जास्तच खराब झाल्याचे समोर आले आहे. तिला सेटवरच उलटी सुरू झाल्याचेही वृत्त समोर आले आहे. 

आजारपणातही अभिनेत्रीच शूटिंग,तब्येत अजून खालावली

मुंबई : झी टीव्हीचा प्रसिद्ध शो 'कलीरे' ची अभिनेत्री अदिती शर्मा आजारी असतानाही शूटींग करत होती. दरम्यान तिची तब्ब्येत जास्तच खराब झाल्याचे समोर आले आहे. तिला सेटवरच उलटी सुरू झाल्याचेही वृत्त समोर आले आहे. या घटनेनंतर सिरियलच्या सेटवर तत्काळ डॉक्टरांना पाचारण करण्यात आलं. मला खूप अस्वस्थ वाटत होतं पण मला शूटही पूर्ण करायचं होतं असं तिने माध्यमांना सांगितलं. सर्वकाही ठिक होईल अस मला वाटत होतं सर्वकाही नेहमीप्रमाणे ठिक होईल पण डायरेक्टरने माझे एक्सप्रेशन ओळखले आणि मी अस्वस्थ झाल्याचे त्याला समजल्याचेही तिने सांगितले.

फूड पॉयझन 

एंटीबायोटीकचा हाय डोज होऊनही तिने शूट पूर्ण केल. 'फूड पॉयझनमुळे मी औषध आणि एंटीबायोटीक्स घेतली होती. तब्येत ठिक वाटत नव्हती पण एपिसोड वेळेत पूर्ण होण्याला मी प्राधान्य दिल्याचे तिने सांगितले. 'कलीरे' हा शो दर्शकांच्या पंसतीस अग्रस्थानी मानला जातो.

Read More