Zeenat Aman Chura Liya Hai Song: एकेकाळी आपल्या सौंदर्याने मनोरंजन क्षेत्र गाजवणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान या अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन यापूर्वी कधीही न सांगितलेली किस्से शेअर करत असतात. त्यांनी नुकतीच 'यादो की बारात' नावाच्या चित्रपटातील 'चुरा लिया है तुमने' या गाण्याबद्दलचा किस्सा शेअर केला. हे गाणं 'थीम साँग' झाल्याचं त्यांनी म्हटलं. झीनत यांनी या गाण्यात परिधान केलेला पांढऱ्या रंगाचा ड्रेस वापरता यावा यासाठी दिग्दर्शक नसीर हुसैन यांच्यासोबत वादही घातला होता. त्यांनीच हा किस्सा सांगितला आहे.
'चुरा लिया है तुमने' हे गाणं इतकं लोकप्रिय कसं झालं याबद्दल झीनत यांनी पोस्ट लिहिली आहे. त्या म्हणतात, "वाजणारी वाईनची ग्लास, गाण्याचे बोल, तो पांढरा ड्रेस, गळ्यातला चोकर (काळा पट्टा) या साऱ्या गोष्टींमुळे चुरा लिया है हे गाणं माझ्यासाठी थिम साँग झालं. मी त्यानंतर जगात कुठेही, कोणत्याही कार्यक्रमाला गेले तेव्हा लोकांना याचीच आठवण होते. गाण्यातील आयकॉनिक ट्यून माझ्या एन्ट्रीलाच वाजते. हे नसतं तर माला गिटार हातात पकडून लिप्सींग करावं लागलं असतं किंवा टेबलवरील दोन रिकामी वाईनची ग्लास एकाच वेळी पाडावी लागली असती... यामधून मी वाहत चालले हे अधोरेखित करायचं होतं."
चित्रपटाचे दिग्दर्शक नसीर हुसैन यांच्यासोबत वाद घातल्यानंतर या गाण्यात आपल्याला दिसणारा पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करण्याची परवानगी झीनत यांनी मिळवली होती. "आधीचा 'मसाला' 'यादो की बारात' चित्रपटामध्ये उत्तम कलाकार (धर्मेंद्र, निती सिंग आणि माझ्यात गुंतलेला दाखवण्यात आलेला विजय अरोरा) होते. त्याचं लेखण सलीम-जावेद यांनी केलं होतं. त्याचं दिग्दर्शन नासीर हुसैन यांनी केलेलं. ज्यांनी हा चित्रपट नीट पाहिला असेल त्यांना हे समजलं असेल की गाणं सुरु होण्याआधीच्या शॉटमध्ये मी तंग गुलाबी रंगाचा सलवार कमीज परिधान केलेला असतो. अचानक मी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसू लागते. त्या ड्रेसचं आणि ड्रेस चेंजचं क्रेडिट माझं आहे," असं झीनत म्हणाल्या.
"मी त्यासाठी नसीरसाहेबांशी वाद घातला होता. त्यांना मला 60 च्या अभिनेत्रीप्रमाणे चुडीदार आणि कुर्त्यामध्ये दाखवायचं होतं. डोळ्यांवर मोठं काजळ आणि इतर गोष्टी असं सारं काही त्यांच्या डोक्यात होतं. मला आधीचेच कपडे विचित्र वाटत होते. मला माझ्या स्टाइलला सूट होणारा ड्रेस हवा होता. सुदैवाने माझा दिग्दर्शक माझं ऐकणारा होता. म्हणून मी मध्यभागी स्पील्ट असेला ड्रेस परिधान केला," असं झीनत म्हणाल्या.