Marathi News> मनोरंजन
Advertisement

Christmas 2018 PHOTO: अबरामने अशा दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा

डिसेंबर महिना उजाडला की सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे ख्रिसमस अर्थातच नाताळ या सणाचे. 

Christmas 2018 PHOTO: अबरामने अशा दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा

मुंबई : डिसेंबर महिना उजाडला की सर्वांनाच वेध लागतात ते म्हणजे ख्रिसमस अर्थातच नाताळ या सणाचे. आनंदाची उधळण करणाऱ्या या सणाची रंगत गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र पाहायला मिळत असून कालकार मंडळीही यात सहभागी झाले आहेत. फक्त कलाकारच नव्हे, तर त्यांचे कुटुंबीयसुद्धा हर्षोल्हासाची उधळण करणाऱ्या या सणाच्या रंगाच रंगले आहेत. 

कलाविश्वातून सर्वप्रथम चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत त्या म्हणजे किंग खानची पत्नी गौरी खान हिने. मुख्य म्हणजे इथे गौरीने ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या असं म्हणण्यापेक्षा अबरामने अनोख्या अंदाजात या शुभेच्छा दिल्या आहेत असं म्हणावं लागेल. गौरीने सोशल मीडियावर मेरी ख्रिसमस असं लिहित शाहरुख आणि अबरामचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ते दोघंही रोषणाईमुळे एका झगमगत्या भागात यउभे राहिले असून, ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आहेत. 

आपल्या बाबांचं म्हणजे शाहरुखचं अनुकरण करायला न विसरणाला अबराम फोटोमध्येही तसाच दिसत आहे. पण, इथे नेमकं अनुकरण कोणी कोणाचं केलं हासुद्धा तितकाच महत्त्वाचा मुद्दा. 

 
 
 
 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

खुदद् शाहरुखनेही ट्विट करत हाच फोटो पोस्ट करत त्यासोबत, 'सितारों के ख्वाब देखने वालों... हमने चाँद को पैदा किया' असं कॅप्शन लिहित ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

गौरीने पोस्ट केलेला अबरामचा हा फोटो सध्या अनेकांचच लक्ष वेधत असून, किंग खानच्या या लेकाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. हिंदी कलाविश्वात स्टारकिड्सच्या यादीत अबरामलाही नेहमीच चाहत्यांचं अमाप प्रेम मिळतं. 

Read More