मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव असतो. मुलगी झिवासोबतचे फोटो आणि व्हिडिओ तो नेहमी शेअर करत असतो. धोनीची कन्या झिवानं पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर धुमाकूळ घातलाय. धोनीने झिवा सोबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यावर लाईक्स, कमेंट्सचा पाऊस पडतोय.
झिवाचा धोनीसमवेतचा नृत्य करतानाचा एक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय.
यामध्ये झिवा नृत्याच्या काही स्टेप्स करत असून धोनीही तिच्यासमवेत नृत्याच्या या स्टेप्स करत आहेत. या व्हिडिओत झिवाच धोनीला नृत्य करायला शिकवत असल्याचं दिसतय.
या व्हिडिओला क्रिकेटप्रेमींकडून खूप लाईक्स मिळत असून धोनीही आपल्या कन्येचा बालहट्ट पुरवण्यासाठी या नृत्याचा आनंद लुटताना दिसत आहे.
झिवाच्या हजारो चाहत्यांनी यावर कमेंट्स करुन तिचं खूप कौतूक केलंय.
तसेच काहींनी धोनीचंही तोंडभरून कौतूक केलंय. तुझ्यासारखा कॅप्टन पुन्हा होणार नाही.
तुमच्या बाप लेकींच नातंही खूप गोड असल्याचं चाहते व्हिडिओ खाली कमेंटमध्ये म्हणत आहेत.