Marathi News> Exclusive
Advertisement

EXCLUSIVE : सुशांत इतका कमजोर नव्हता की तो आत्महत्या करेल - अंकिता लोखंडे

अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांच्या आत्महत्येनंतर अनेकांना धक्का बसला. त्याची मैत्रिण अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने प्रथम सुशांतबद्दल आपले मत जाहीर केले आहे.  

EXCLUSIVE : सुशांत इतका कमजोर नव्हता की तो आत्महत्या करेल  - अंकिता लोखंडे

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) यांच्या आत्महत्येनंतर अनेकांना धक्का बसला. त्याची मैत्रिण अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिने प्रथम सुशांतबद्दल आपले मत जाहीर केले आहे. ZEE NEWS चे एडिटर-इन-चीफ सुधीर चौधरी यांच्याशी बोलताना अंकिता म्हणाली, सुशांत इतका कमजोर नव्हता की तो आत्महत्या करेल. यावर विश्वास नाही. मी आणि संपूर्ण कुटुंबाला या घटनेने धक्का बसला आहे. आम्ही अजुनही या धक्क्यामध्ये आहोत. मी कोणावरही आरोप करत नाही. खरोखर काय झाले ते मला जाणून घ्यायचे आहे, असं काय झालं? सुशांत एक चांगला माणूस होता. तो कधी नाराज होत नसे. कौटुंबिक कारणामुळे किंवा फिल्म इंडस्ट्रीतील वाद यामुळे त्यांने आत्महत्या केली असे म्हणणे योग्य होणार नाही. 

अंकिता म्हणाली, तो आपल्या करियरबाबत गंभीर होता. मात्र, यात यश मिळणार नाही या भीतीतून तो आत्महत्या करु शकत नाही. हे अशा प्रकारे समजू शकते. जेव्हा आम्ही दोघांची पहिली टीव्ही मालिका 'पवित्र रिस्ता' चालू होती, तेव्हा त्याने ती मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांने तीन वर्ष पहिल्या सिनेमासाठी वाट पाहिली आणि त्यानंतर त्याला 'काई पो छे' हा चित्रपट मिळाला. माझ्या सांगण्याचा हेतू हा की, तो संघर्ष करणारा होता. तो पळणारा किंवा पराभूत होणारी व्यक्ती नव्हती. तो नेहमी म्हणायचा, जर यश मिळाले नाही तर शेती करेन. लघुपट करेन. म्हणूनच, तो एक आनंदी, यशस्वी, बुद्धिमान व्यक्ती होता. त्याने इतरांना प्रेरित केले आहे. तो कधीही आत्महत्या करेल यावर विश्वास बसत नाही.

अंकिता पुढे म्हणाली, हे खरे आहे की, अलिकडच्या वर्षांत मी सुशांतसोबत नव्हती. परंतु गेल्या एका वर्षापासून मला असे वाटते की तो मीडियासह सर्वत्र कमी जाणवू लागला होता. अचानक तो एकटा झाला होता. उदास वाटत होता. 

'अपवित्र' रिश्‍ता

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांनी रियाविरोधात गुन्हा आणि पैशाबाबत आरोप केला आहे. याबाबत ती म्हणाली, मला  याबद्दल काही बोलायचे नाही. कारण तपास चालू आहे. पण हेसुद्धा सत्य आहे की सुशांतची आत्महत्या धक्का देणारी गोष्ट आहे. याचीही चौकशी झाली पाहिजे अलीकडील काळात त्याच्याबरोबर कोण होते आणि त्याच्या आयुष्यात काय घडले हे तपासले गेले पाहिजे. शेवटी, अशा कोणती परिस्थिती होती ज्यामुळे त्याला नैराश्याने ग्रासले होते. कारण तो यशस्वी व्यक्ती होता. त्याने कठोर परिश्रम करत, कौशल्य आणि समजूतदारपणासह आपले स्थान निर्माण केले होते. हे देखील खरं आहे की तो एक संवेदनशील आणि भावनिक माणूस होता. परंतु हेही पाहिले पाहिजे की गेल्या दीड वर्षात त्याच्या सभोवतालचे लोक कोण होते आणि यामुळे तो आपल्या लोकांपासून दूर गेला? मीडियात आलेल्या वृत्तानुसार तो आपल्या कुटुंबापासून एकटा होता. तो त्यांच्यापासून तुटला होता का? त्याच्या वडिलांसह बहिणींशी फारच कमी बोलत होत असे, या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे.

Read More