Marathi News> हेल्थ
Advertisement

मधुमेही रूग्णांनी या ५ फळांचा आहारात अवश्य समावेश करावा!

ब्लड शुगर कंट्रोल करायची असेल तर तुमच्या आहारात काही विशिष्ट खाद्यपदार्थांचं सेवन केलं पाहिजे.

मधुमेही रूग्णांनी या ५ फळांचा आहारात अवश्य समावेश करावा!

मुंबई : गोडं खाणं जवळपास प्रत्येकाला आवडतं. तर डायबेटीजग्रस्त रूग्णांना गोडाधोडाचे पदार्थ खाणं अधिकचं आवडतं. याशिवाय डायबेटीक रूग्ण फळांचंही सेवन करतात. मात्र फळांच्या सेवनानेही रक्तातील साखर वाढते. अशावेळी कमी साखर असलेल्या फळांचं सेवन रूग्णांनी केलं पाहिजे. जर तुम्हाला ब्लड शुगर कंट्रोल करायची असेल तर तुमच्या आहारात काही विशिष्ट खाद्यपदार्थांचं सेवन केलं पाहिजे.

चेरी

चेरीमध्ये अँन्टी इफ्लेमेटरी गुण असतात. याशिवाय चेरीमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्सचं प्रमाण फार कमी असतं. ज्यामुळे याच्या सेवनाने ब्लड शुगर वाढत नाही. 

लिची

एका संशोधनानुसार, लीचीमध्ये अँन्टी ऑक्सिडंट, अँन्टी डायबेटीक तसंच इम्नूयोमॉड्यूलेटरी गुण असतात. जे शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढवतात. यासाठी लिची डायबेटीक रूग्णांसाठी फायदेशीर मानली जाते.

पपई

एका वैद्यकीय संशोधनानुसार, पपई टाईप 2 डायबेटीसचं प्रमाण वाढण्यास प्रतिबंध करतं. पपईमध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स देखील खूप कमी प्रमाणाच असतं. ज्यामुळे ब्लड शुगरच्या लेवलला नॉर्मल राखण्यासाठी मदत करतं. 

पीच

पीचमध्ये कॅलरीजचं प्रमाण फार कमी असतं. यासोबतच यामध्ये व्हिटॅमीन सी, फायबर आणि अॅन्टी ऑक्सिडंटचे गुणधर्म असतात. जे ब्लड शुगरच्या रूग्णांसाठी उपयुक्त ठरतात.

जांभूळ

जांभूळाच्या सेवनाने ब्लड शुगर देखील नियंत्रित केली जाऊ शकते. याशिवाय डायबेटीसच्या रुग्णांना जांभळामध्ये असलेली बी फायदेशीर ठरते. आयुर्वेदानुसार, जांभळाच्या बियांमध्ये जांबोलीन आणि जॅम्बोसिन नावाचा एक घटक असतो. हे घटक फाइटोकेमिकल्स ब्लड शुगर रिलीज करण्याच्या प्रक्रियेला धिम्या गतीने करतात. परिणामी शरीरातील इन्सुलिन उत्पादन वाढतं.

Read More