Marathi News> हेल्थ
Advertisement

Belly Fat : आता केवळ एक एक्सरसाईज करणार तुमची कंबर कमी!

आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अशी एक एक्सरसाईज सांगणार आहोत जी तुमचं बेली फॅट कमी करण्यासाठी मदत करेल.

Belly Fat : आता केवळ एक एक्सरसाईज करणार तुमची कंबर कमी!

मुंबई : बेली फॅट कमी करण्यासाठी आपण अनेक पद्धती वापरतो. मात्र काही केल्या या समस्येपासून सुटका होत नाही. ट्रेडमिलवर तासनतास धावल्यावर तसंच भरपूर घाम गाळल्याने तुमचं वजन कमी होईल परंतु तुमच्या पोटाची चरबी कमी होईलच असं नाही. मुळात बेली फॅट कमी करण्यासाठी खूप मेहनत करत असाल, परंतु कोणताही परिणाम दिसून येत नसेल, तर तुम्ही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. 

अनेकांकडे एक्सरसाईज करण्यासाठी वेळ नसतो. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी अशी एक एक्सरसाईज सांगणार आहोत जी तुमचं बेली फॅट कमी करण्यासाठी मदत करेल. तसंच ही एक्सरसाईज तुम्ही अंघोळपूर्वी, जेवणापूर्वी शिवाय रात्री जेवण्यापूर्वीही करू शकता. 

त्याचा परिणाम फक्त तुमच्या पोटाच्या चरबीवरच दिसणार नाही, तर तुम्हाला तुमच्या शरीराचा आकारही बदलताना दिसेल. यामुळे तुमचं बेली फॅट कमी होऊन कंबरेचा घेरही योग्य आकारात दिसेल. 

तुम्ही पुशअप्सबद्दल ऐकलं असेल. त्याचा परिणाम पोटाच्या चरबीवर खूप लवकर होतो. पण जर तुम्हाला हे खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही प्लँक करू शकता. खाली दिलेल्या स्टेप्समध्ये समजून घ्या, आणि पहा प्लँक कसं करावं

Plank सुरु करण्यापूर्वी जमिनीवर पोटावर झोपा. त्यानंतर पायाची बोटं आणि हाताच्या बाजूंवर शरीर उचला. 

यावेळी पाठ आणि मान सरळ ठेवा

असा पोसिशनमध्ये तुम्ही 20, 30, 45 ते 60 सेकंद राहू शकता. ही एक सोपी एक्सरसाईज असून तुम्ही कोणत्याही वेळेला ती करू शकता.

Read More