Marathi News> हेल्थ
Advertisement

Belly Fat : सुटलेलं पोट कमी करायचंय? मग सकाळी उठून 'ही' 3 कामं करा

काही चांगल्या सवयी आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही सकाळी खूप वजन कमी करू शकता.

Belly Fat : सुटलेलं पोट कमी करायचंय? मग सकाळी उठून 'ही' 3 कामं करा

मुंबई : पोटाच्या चरबीमुळे आजकाल अनेकजण त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी प्रत्येकजण विविध पद्धतींचा अवलंब करतो. मात्र अनेकांना जिममध्ये जाऊन घाम गाळायला वेळ मिळत नाही. म्हणूनच काही चांगल्या सवयी आहेत ज्याचा अवलंब करून तुम्ही सकाळी खूप वजन कमी करू शकता. या कामांमुळे शरीरातील चरबी कमी होईल.

कसं कमी कराल बेली फॅट

कोमट पाणी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी सकाळी लवकर कोमट पाणी पिणं खूप फायदेशीर आहे. पाणी शरीराला समान प्रमाणात हायड्रेट करतं. तसंच कोमट पाण्यात मध किंवा लिंबू मिसळून प्यायल्यानेही चरबी बर्न सुरुवात होते.

नाश्त्यासाठी प्रोटीन आणि फायबरचा समावेश

प्रोटीन आणि फायबरने भरलेला नाश्ता खाल्ल्याने दिवसभर भूक कमी होते. अशा न्याहारीमुळे दिवसभर शरीराला उर्जा मिळते आणि दर तासाला होणारी भूक देखील दूर राहते. परिणामी अन्नाचं सेवन कमी होतं. तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये अंडी, दही आणि काजू इत्यादींचा समावेश करू शकता.

पाण्याची बाटली

सकाळी पाणी पिण्याव्यतिरिक्त, तुम्ही नेहमी तुमच्यासोबत पाण्याची बाटली ठेवावी आणि दिवसातून किमान 2 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

Read More