Marathi News> हेल्थ
Advertisement

घरात तमालपत्र जाळण्याचे हे आहेत भरपूर फायदे

तमालपत्राचा वापर जेवणात केला जातो. भाज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. मात्र याचा आणखीही एक फायदा आहे. 

घरात तमालपत्र जाळण्याचे हे आहेत भरपूर फायदे

मुंबई : तमालपत्राचा वापर जेवणात केला जातो. भाज्यांचा स्वाद वाढवण्यासाठी तमालपत्राचा वापर केला जातो. मात्र याचा आणखीही एक फायदा आहे. 

तमालपत्र एका भाड्यात ठेवून जाळा. त्यानंतर जो काही चमत्‍कार होईल ते पाहून तुम्ही हैराण व्हाल. घरात तमालपत्र जाळल्याने केवळ घर सुगंधितच होणार नाही तर यामुळे तणावही कमी होण्यास मदत होईल. 

घराला सुगंधित बनवण्यासाठी लोक विविध फ्रेशनरचा वापर करतात. मात्र या महागड्या उत्पादनांचा वापर कऱण्याऐवजी तमालपत्राचा वापर करा. 

यामुळे घर तर सुगंधित होतेच मात्र त्याचबरोबर तणावही कमी होतो. याच्या सुगंधामुळे थकवा आणि चिडचिडेपणा कमी होतो. तसेच रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास मदत होते. 

तमालपत्र आजूबाजूच्या वातावरणातील दूषित कण कमी करतात. याशिवाय घरात झुरळे झाली असल्यास तमालपत्रे जाळून कोपऱ्यात ठेवा. यामुळे झुरळे कमी होतात. मात्र एकावेळी भरपूर तमालपत्रे जाळू नका. एका वेळी एकच पान जाळा.

Read More