मुंबई: अनेक लोकांना सकाळी उठल्यावर दूधाचा कडक चहा पिण्याची सवय असते. काहींची तर चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरूवातच होत नाही. पण, सकाळी सकाळी दूधाचा चहा पिल्यामुळे आरोग्याचे मोठे नुकसान होते. अशा वेळी ब्लॅक टी तुम्हाला फायदोशीर ठरू शकतो. ब्लॅक टी आरोग्यासाठी फायदेशीर असतो. म्हणून जाणून घ्या ब्लॅक टी सेवनाचे आरोग्यदायी फायदे.
ब्लॅक टी पिण्याचे फायदे
- कॅन्सरचा धोका कमी होतो. एका अभ्यासात म्हटले आहे की, जे लोक ब्लॅक टीचे सेवन नियमीतपणे करतात त्यांना कॅन्सरचा धोका कमी होतो.
- ब्लॅक टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अँटीऑक्सिडेंट असते. जे शरीराला मोठी उर्जा देते.
- शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी ब्लॅक टीचे नियमीत सेवन फायदेशीर ठरते.
- तुम्ही जर दिवसातून तीन ते चार वेळा ब्लॅक टीचे सेवन करत असाल तर, हृदयविकाराचा त्रास होण्याचा धोका कमी होत असल्याचा दावा अभ्यासक करतात.
- दमा असलेल्या लोकांनी ब्लॅक टीचे सेवन केले असता फायदा होतो.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या
दरम्यान,आरोग्यवर्धक फायदे असले तरीही तुम्ही खास उपचार म्हणून जर ब्लॅक टीचे सेवन करत असाल तर तज्ज्ञांचे मार्गदर्शन करा.